PESA Recruitment : पेसाअंतर्गत भरतीवरून गावितांचा सरकारला अल्टीमेटम, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

J P Gavit And Prakash Ambedkar : पेसाअंतर्गत भरतीवरून माजी आमदार जे पी गावित यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. तर यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लाडकी बहीण योजनेच्या पैशांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
J P Gavit And Prakash Ambedkar
J P Gavit And Prakash AmbedkarAgrowon
Published on
Updated on

Pune News : नाशिक येथील आदिवासी विकास भवन कार्यालयाच्या परिसरात गेल्या चार दिवसापासून पेसाअंतर्गत भरतीबाबत आमरण उपोषण केले जात आहे. माजी आमदार जे पी गावित उपोषणावर बसले असून यावर अद्यापही सरकारी पातळीवर कोणताच निर्णय घेण्यात आलेली नाही. यावरून गावित यांनी राज्य सरकारला २८ तारखेपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. तर याच प्रश्नावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लाडकी बहीण योजनेच्या पैशांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे सध्या लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे.

राज्यातील आदिवाशी समाजातील पात्र उमेदवार हे पेसाअंतर्गत भरतीबाबत आग्रही असून यावरून सध्या आंदोलने केली जात आहे. मात्र राज्य सरकारकडून यावर अद्याप कोणतीच स्पष्टता करण्यात आलेली नाही. यावरूनच गेल्या चार दिवसापासून गावित नाशिकच्या आदिवासी विकास भवन कार्यालयात आमरण उपोषणावर बसले आहेत. सध्या प्रकृती खालावली असून डॉक्टरांकडून तपासणी केली जात आहे.

J P Gavit And Prakash Ambedkar
Agriculture Officer : कृषी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार कधी? कृषी पदवीधारकांची भरती रखडली

यावेळी गावित यांनी पेसा कायदा आणि पेसा भरतीबाबत निर्णय घेण्यात येऊन पात्र उमेदवारांच्या भरतीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी केली आहे. तर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा ठाम निर्णय गावित यांनी घेतला आहे. गावित यांनी सरकारला शेवटचा इशारा देताना २८ तारखेपर्यंत आंदोलनाची दखल घेऊन तोडगा न काढा असे म्हटले आहे. तसेच तोडगा न काढल्यास मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी धडकू असा इशारा ही गावित यांनी दिला आहे.

दरम्यान रविवारी (ता.२५) विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी गावितांची आंदोलनस्थळी भेट घेऊन चर्चा केली होती. तर झिरवाळ यांनी रिझर्वेशन कोट्यातील २५ आणि खुल्या वर्गातील २ आमदारांची बैठक येत्या दोन दिवसात आदिवासी विकास भवन कार्यालयात घेऊ असे आश्वासन दिले. तसेच पेसा कायदा आणि पेसा भरतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा विषय मार्गी लावू, असेही आश्वासन नरहरी झिरवाळ यांनी जे पी गावित यांना दिले होते.

J P Gavit And Prakash Ambedkar
Prakash Ambedkar : ऊसदराच्या मुद्यावरून प्रकाश आंबेडकर शेतकरी नेत्यांवर भडकले

तर आता याचमुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गावितांची भेट घेतली आहे. यावेळी आंबेडकर यांनी गावितांना मोठी ऑफर दिल्याचेही बोलले जात आहे. तर माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आदिवासी समाज ७.५ टक्के असून त्यांच्यासाठी सरकारने ७० हजार कोटींची तरतूद होती. तर यातील दहा हजार कोटी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठेवण्याची गरज होती. पण दुर्दैवाने या सरकारला याची जाणीव नाही. यामुळेच आदिवासी भरतीत बोगस आदिवाशी होत आहेत. त्यामुळे नाशिकचे आदिवासी आयुक्तालय आंदोलनासाठी लक्ष करण्यापेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयावर लक्ष करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

तसेच लाडकी बहीण योजनेला कुठून पैसे आला? आदिवासीच्या बजेटचे ७ हजार कोटी रूपयांवर सरकारने डल्ला मारला का? आदिवाशींचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केले का? असे प्रश्न उपस्थित करताना सरकारने आदिवासीच्या बजेटचे विवरण द्यावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com