Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Sharad Pawar : जमीन कमी होतेय, शेतीवरचा बोजा वाढतोय, शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता

Sharad Pawar On Agricultural Land : वाढत्या सुधारणांसह शेतीही सुधारत आहे. सध्याच्या आधूनिक शेती पद्धतीत मात्र जमीन कमी होत असून शेतीवरचा बोजा वाढतोय असे जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी वक्तव्य केलं आहे.
Published on

Pune News : स्व. तांबे आणि स्व. लता तांबे यांच्या शेती, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामामुळे जुन्नर तालुक्यात अमोघलाग्र बदल झाला. त्याचा परिणाम आज उसाची, द्राक्षाची, केळीची किंवा शिवनेरी आंब्याची शेतीच्या क्षेत्रामध्ये तालुक्याचा नावलौकिक सगळीकडे गेला आहे. पण सध्याच्या आधुनिक शेती पद्धतीत जमीन कमी होत असून शेतीवरचा बोजा वाढतोय अशी चिंता जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी वक्तव्य केली आहे. ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आयोजित स्व. श्रीकृष्ण तांबे व स्व. लता तांबे यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावेळी बोलत होते.

यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी आमदार जगन्नाथराव शेवाळे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी आमदार शरद दादा सोनवणे, देवदत्त निकम, संजय काळे, कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर, विशाल तांबे, अनिल तांबे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, शेतीसोबतच कारखानदारी उभी राहिली पाहिजे व ती शेतीवर आधारित असावी असे धोरण निवृत्ती शेठ शेरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या नजरेसमोर ठेवला. त्यामुळेच एका उत्तम साखर कारखान्याची उभारणी येथे झाली. एक काळ असा होता की इथला ऊस मुंबईच्या भागात जात होता. तेथे या भागातील लोक रसवंती चालवण्याचं काम करत. काळानुसार आज बदल झाले आहेत. यातूनच आपले जीवन बदलतयं.

Sharad Pawar
Sharad Pawar : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा मी स्वत: आंदोलनात उतरतो; शरद पवारांचा सरकारला इशारा

आज कारखान्यातून साखर तयार होते. तसेच वीज, इथेनॉल तयार केली जात आहे. आज जेव्हा मी या भागातून हेलिकॉप्टर किंवा रस्त्याने जातो तेव्हा या भागातील संपन्न शेती व त्यावर कष्टाने बांधलेली घरे बघून मनापासून आनंद होतो. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दृष्टीने या भागात जी पाण्याची सुविधा झाली त्या सुविधेतून सोन तयार करण्याची ताकद शेतकऱ्यांनी दाखवली त्यामुळे एकंदरीत या भागाचा चेहरा बदलतोय, असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar
NCP–Sharad Chandra Pawar party : ‘महायुतीचे काळे कारनामे…’, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सरकरावर टीका

आता शेती सुधारली, शेतकऱ्यांची मुलं सुधारली. पण आता केवळ शेती करून चालणार नाही. यात बदल झाला पाहिजे. जमीन कमी होतेय आणि शेतीवरचा बोजा देखील वाढतोय. १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. यातील ७०-८० टक्के लोक शेती करत होते. आता काळ बदलला आहे. देशाची लोकसंख्या शंभर कोटीच्या वर गेली असून शेत जमीन आहे तेवढीच आहे. उलट विकासाच्या कामासाठी जमीन वापरली जात आहे.

त्यामुळे कुटुंबातील एका व्यक्तीने शेती करावी व एकापेक्षा अधिक व्यक्ती असतील तर त्यांनी अन्य क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत पवार यांनी व्यक्त केलं आहे. आपल्या भागातील अनेक जन मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट, मुंबईचे बंदर तर नव्या मुंबईची कृषी बाजार समिती काम करताना दिसतात. हे चित्र चांगलं आहे. तरीही शेतीवरचा बोजा कमी करण्याची काळजी घेतली पाहिजे. हे करण्यासाठी नवी पिढी शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध केली पाहिजे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com