Agriculture Officer : कृषी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार कधी? कृषी पदवीधारकांची भरती रखडली

Maharashtra Agriculture : राज्याच्या कृषी आणि वित्त विभागाने कृषी अधिकाऱ्यांच्या राजपत्रित गटाच्या २५८ पदांना मान्यता दिली आहे.
Agriculture Officer
Agriculture Officeragrowon
Published on
Updated on

Sangli Agriculture Officers : सांगली जिल्ह्यात कृषी पदवीधरांच्या सुमारे १२५ जागा रिक्त आहेत. राज्याच्या कृषी आणि वित्त विभागाने कृषी अधिकाऱ्यांच्या राजपत्रित गटाच्या २५८ पदांना मान्यता दिली आहे; परंतु केवळ पदांच्या मंजुरीची फाईल लालफितीत अडकल्यामुळे येत्या २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या नागरी सेवा राजपत्रित अधिकारी संयुक्त पूर्व परीक्षेत या पदांचा समावेश करण्यात आला नाही.

परिणामी, गेल्या दोन वर्षांपासून कृषी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे कृषी पदवीधारक निराश झाले आहेत.

यावर जिल्ह्यातील कृषी विभागाकडे सुमारे १२५ कृषी पदवीधरांच्या जागा रिक्त आहेत. टप्प्याटप्‍याने भरती होईल, तशी रिक्त पदेही भरली जात आहेत. जिल्ह्यात केवळ १५ ते १८ पदे कंत्राटी पध्दतीने भरली जातात. गेल्या दोन-तीन महिन्यांत काही रिक्त पदे भरण्यात आली असल्याची माहिती सांगली जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.

कृषी विभागाने सन २०२३ मध्ये एकही जागा भरलेली नाही. सन २०२१ आणि २०२२ या वर्षांत निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती दिलेली नाही. कृषी सेवेतील पद भरतीची जाहिरात यावर्षीच्या होणाऱ्या पदभरतीत न असल्यास, खुल्या प्रवर्गात असणाऱ्या उमेदवारांना पदभरतीसाठी अन्य संवर्गांपेक्षा कमी वयोमर्यादा शासनाने दिली आहे. त्यामुळे त्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी गेल्या काही वर्षांपासून केलेला अभ्यासही वाया जाणार असल्याचे चित्र आहे.

Agriculture Officer
Kolhapur Crop Damage : महापुराने ओला चारा कुजला; दूध व्यवसायावर परिणाम, शेतकऱ्यांचे बजेट कोलमडलं

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा राजपत्रित अधिकारी संयुक्त पूर्वपरीक्षा २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. कृषी आणि वित्त विभागाने कृषी सेवा पदभरतीच्या २५८ जागांची भरती करण्यास २०२४ मध्ये मंजुरी दिली आहे.

या पदभरतीसंदर्भातील कागदपत्रे प्रशासकीय पातळीवर कृषी आणि वित्त विभागाने मान्यता देऊन सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविणे आवश्यक होते; परंतु संबंधित फाईल लालफितीत अडकल्याचे कृषी पदवीधरांचे मत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com