
Solapur / Pune News : राज्यासह अख्या देशाचे लक्ष आज होणाऱ्या मारकडवाडी बॅलेट पेपरवर मतदानाकडे लागले होते. पण ते जमाबंदी आदेश आणि पोलिसांच्या दबावामुळे तात्पुरते थांबवण्यात आले आहे. यानंतर भाजपचे नेते माजी आमदार राम सातपुते यांनी थेट आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच मारकडवाडी ग्रामस्थांच्या आडून मोहिते पाटील खोटा नेरेटिव्ह सेट करत आहेत. या प्रकरणात आमदार उत्तम जानकर यांना प्यादे असून खरे मास्टर माईंड मोहिते पाटील असल्याचा आरोप केला आहे.
पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सातपुते यांना जानकर यांच्यापेक्षा मारकडवाडीत अधिक मते मिळाली आहेत. याचवरून ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला आहे. तर पुन्हा एकदा मतदान घेण्याची घोषणा करताना बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव केला. त्याप्रमाणे आज मतदान होणार होते. जे पोलिसांनी होऊ दिले नाही.
यानंतर आता आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली आहे. बॅलेट पेपरवर मतदानावरून सातपुते यांनी थेट मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मारकडवाडी ग्रामस्थांच्या आडून मोहिते पाटील खोटा नेरेटिव्ह सेट करत आहेत. या प्रकरणात आमदार उत्तम जानकर प्यादे असून खरे मास्टर माईंड मोहिते पाटील असल्याचा आरोप सातपुते यांनी केला आहे.
मारकडवाडी ग्रामस्थांना आंदोलन करायचे नव्हते. मात्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ते करायला भाग पाडले. मोहिते पाटील यांचा भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न होता. त्यांच्या गुंडांनी गेल्या तीन दिवसापासून ग्रामस्थांना धमकावले. यातूनच हा प्रकार झाला. पण आम्हाला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी माळशिरस तालुक्यातील जनता आपल्या बरोबर आहेत, असे सातपुते यांनी म्हटले आहे.
यावेळी सातपुते यांनी, मतदारसंघातील १ लाख ८ हजार ५६६ मतदारांनी आपल्याला मतदान केले आहे. मी आमदार असताना मारकडवाडीसाठी निधी दिला. मात्र मोहिते पाटलांनी साधी विट देखील लावली नाही. पण मी येथे सात कोटी रुपये खर्चून एका छोट्या पर्यटन केंद्राची उभारणी केली. गावात चांगले रस्ते केले. सभामंडप उभारल्याचे सातपुते यांनी दावा केला आहे.
या कामामुळेच मला गावात मत्ताधिक्य मिळाले असून लाडक्या बहिणींचे प्रेम अधिक मिळाल्याचे सातपुते म्हणाले. गावात ७०० हून अधिक महिलांना लाडकी बहिण योजनेचा फायदा झाला असून त्या माझ्या मागे उभारल्या. यामुळेच १ हजारांहून अधिक मते पडली. पण मोहिते पाटील यांनी खोटा नेरिटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. त्याला ग्रामस्थांनी भीक घातली नाही, असाही टोला सातपुते यांनी यावेळी लगावला.
दरम्यान गावातील लाडक्या बहिणी मात्र सातपुते यांच्या दाव्याच्या विरोधात भूमीका स्पष्ट करताना दिसत आहे. गावातील काही महिलांनी आज थांबवण्यात आलेल्या मतदानावरून सरकारला इशारा दिला आहे.
गावातील महिलांना आजपर्यंत आम्ही उत्तम जानकर यांना ताकद दिली असून त्यांनाच गावातून मताधिक्य दिलं जात होत. पण यंदा सातपुते यांना जानकर यांच्या पेक्षा अधिकची मते मिळाली. यामुळेच ईव्हीएममध्ये काहीतरी घोळ वाटत आहे. यामुळे आम्ही परत मतदान करण्याची मागणी करत आहोत.
एकीकडे आम्हाला लाडकी बहिणी म्हणायचे आणि दुसरीकडे आमचा अधिकार रोखण्याचे काम केलं जात आहे. सरकारने आम्हाला पैसे दिले. मात्र ते पैसे आम्ही खात्यातून काढले नाहीत. सरकारने पैसे परत मागितले तर परत करू असा पवित्रा घेतला आहे.
गावकरी आंदोलनावर ठाम
गावातील मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली असलीतरीही मारकडवाडी ग्रामस्थ्यांनी वेगळ्या पद्धतीने लढा देत राहणार असल्याचे सांगितले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.