Voting on ballot paper : राम सातपुतेंना मिळालेली मते अमान्य; मारकडवाडी ग्रामस्थांचा बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचा ठराव

Assembly Election Result 2024 : राज्यातील पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर पक्ष आवाक झाले आहेत. यानंतर राज्यात आता ईव्हीएमविरोधात टीका होत आहेत.
Voting on ballot paper
Voting on ballot paperAgrowon
Published on
Updated on

Pune/Solapur News : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ईव्हीएम मशीवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने माजी आमदार राम सातपुते यांना गावात पडलेले माताधिक्य अमान्य केले आहे. तसेच ईव्हीएम मशीनऐवजी येथे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव घेण्यात आला आहे. गावच्या या निर्णयामुळे अख्या राज्यात खळबळ उडाली आहे. तर प्रशासनाकडून यासाठी परवानगी दिली जाते का? याकडे सोलापूरसह राज्याचे लक्ष लागले आहे.

माळशिरस विधानसभा मतदारसंघात यंदा शरद पवार गटाचे उत्तम जानकर आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात जोरदार लढत झाली. या लढतीत उत्तम जानकर यांचा विजय झाला. पण सातपुते यांना मार्कडवाडी गावात १००३ मते पडली. तर जाणकर यांना गावातून फक्त ८४३ मते मिळाली.

Voting on ballot paper
Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

मार्कडवाडी गावात आजपर्यंत शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना कायम लिड मिळत होते. पण यंदा गावातील मतदानात सातपुते यांनी बाजी मारत लिड मिळवले आहे. यामुळे गावातील जानकर गटाने स्वखर्चाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. ३ डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला आहे. तर याबाबत जानकर गटाने माळशिरस तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तसेच शासकीय कर्मचारी देण्याबाबत विनंती देखील केली आहे.

जानकर गटाने दिलेल्या निवेदनात, यंदा पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सातपुते यांना जाणकर यांच्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले असून याआधी असे कधीही झालेले नाही. याआधी २००९, २०१४, आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जाणकर यांना गावात मताधिक्य मिळाले होते. लोकसभेवेळी देखील गावाचे ८० टक्के मतदान भाजपविरोधात झाले होते.

Voting on ballot paper
Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

पण यंदा निवडणुकीत काहीतरी घोळ झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. नेमका घोळ काय झाला आहे हे पाहण्यासाठी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव केला आहे. या ठरावाची प्रत आणि निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. तर बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्यासाठी संपूर्ण खर्च गाव करण्यास तयार असून शासकीय कर्मचारी मिळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी तयारी पूर्ण

मारकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याची तयारी पूर्ण केली असून मतपत्रिका छापण्यास दिल्या आहेत. तसेच ज्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी पुन्हा बॅलेट पेपरवर चाचणी मतदान करताना ज्याला मतदान केले आहेत त्यालाच करावे, असे आवाहन केले आहे.

बॅलेट पेपरवर मतदान घेणार पहिलेच गाव

सध्या काँग्रेससह मविआतील इतर पक्षातील नेत्यांनी ईव्हीएम मशीवर आक्षेप घेतले असून चिंता व्यक्त केली आहे. यादरम्या आता मारकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याची तयारी दर्शवली आहे. तर हे मतदान ३ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे. यानंतर लगेच मतमोजणी पार पडेल. यानंतर निकाल येणार आहे. यामुळे आता अख्या राज्याचे लक्ष मारकडवाडीच्या बॅलेट पेपरवर चाचणी मतदानाकडे लागले असून नेमकं काय सत्य बाहेर येतं याकडे लागले आहे.

काँग्रेसची टीका

यादरम्यान सोलापुरमधील मारकडवाडी गावच्या ठरावावरून काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे-पाटील यांनी याबाबत ट्विट करत, मार्कडवाडी गावच्या लोकांनी स्वखर्चाने बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या राम सातपुते यांना मिळालेले गावातील लिड ग्रामस्थांना मान्य नाही. यामुळे आता बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली आहे. आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होवून जाऊद्या!, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com