Satara Forest Fire: वणव्यामुळे वनसंपदा जळून नष्ट

Environmental Destruction: आदर्श गाव निढळच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगररांगावर काही अज्ञात विघ्नसंतोषींनी लावलेल्या वणव्यात शेकडो एकरांवरील वनसंपदा जळून नष्ट झाली.
Forest Fire
Forest FireAgrowon
Published on
Updated on

Satara News: आदर्श गाव निढळच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगररांगावर काही अज्ञात विघ्नसंतोषींनी लावलेल्या वणव्यात शेकडो एकरांवरील वनसंपदा जळून नष्ट झाली. निढळकरांनी मोठ्या कष्टाने लावलेली आणि जगवलेली हजारो झाडेही या वणव्यात होरपळल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वणवा लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱ्या अनेक लोकाभिमुख अभियानामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून आदर्श निर्माण करणाऱ्या खटाव तालुक्यातील निढळ गावच्या वरच्या बाजूला डोंगरांची रांग आहे.

Forest Fire
Kewda Forest Destroyed: नदी सुशोभीकरणासाठी बारामतीतील केवड्याचे बन उद्ध्वस्त

या डोंगरावर निढळकरांनी मोठ्या कष्टाने जलसंधारणाची कामे करून गावची भूजल पातळी वाढवली आहे. निढळमधील जलसंधारणासह विविध कामे पाहण्यासारखी राज्यभरातून लोक भेट देतात.

Forest Fire
Forest Fire : वणव्यात आंब्याची दीड हजार झाडे होरपळली

याच डोंगररांगांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणही करण्यात आले आहे. भरपूर पाणी आणि हिरवागार निसर्ग असल्याने या परिसराचे मनमोहक रुप पहाण्यासाठी पावसाळ्यानंतर अनेक जण भेट देतात, मात्र गेल्या दोन तीन वर्षांपासून या भागात काही विघ्नसंतोषी उन्हाळ्यात वणवा लावण्याचे दुष्कृत्य करत आहेत.

कारवाईची मागणी

गेल्या आठवड्यात येथील डोंगरांवर वणवा लावल्याने शेकडो एकर परिसरातील वनसंपदा जळून खाक झाली आहे. डोंगररांगांचा परिसर काळाकुट्ट झाला आहे. लावलेली हजारो झाडे या वणव्यात होरपळून गेली आहेत. जाणूनबुजून असे दुष्कृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com