Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Forest Fire In Garhwal : उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील जंगलात लागलेल्या आगीवर प्रशासनाकडून नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा लागल्याने ४६ हेक्टरहून अधिक वनक्षेत्र बाधित झाले आहे.
Uttarakhand Forest Fire
Uttarakhand Forest FireAgrowon
Published on
Updated on

Pune News : उन्हाच्या वाढत्या झळांमुळे सर्वसामान्य हैराण झाले असून उत्तराखंडमधील जंगलेही धुमसत आहेत. गेल्या काही दिवसापासून वाढेल्या उष्णेतेच्या लाटेचा फटका उत्तराखंडमधील जंगलांना बसला असून आधी नैनिताल जिल्ह्यातील जंगले आणि आता गढवालपासून कुमाऊंपर्यंतच्या जंगलामध्ये आग लागली आहे. याआगीमुळे ४६ हेक्टरहून अधिक वनक्षेत्र बाधित झाले असून येथे बुघवारी ४० ठिकाणी जंगलात आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. तर सर्वाधिक २६ घटना गढवालमधील आणि १४ कुमाऊंमधल्या आहेत.

देशातील तापमानात वाढ होत असून हवामान विभागाने अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हे ४० अंशांच्या बाहेर गेले आहे. यादरम्यान जंगलात आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. बुधवारी (१ मे) टिहरी धरण, भूसंरक्षण राणीखेत, अल्मोडा, बागेश्वर, पिथौरागढ राखीव वनक्षेत्र, रामनगर, नरेंद्र नगर, तराई पूर्व आरक्षित वनक्षेत्र, मसुरी वनविभागासह नागरी वनक्षेत्रातात अशा ठिकाणी आगीच्या घटना समोर आल्या आहेत.

Uttarakhand Forest Fire
Nainital forest fires : नैनितालच्या जंगलात आग; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचे मुख्यमंत्री धामी यांचे आदेश

येथील सिव्हिल सोयम पौरी वनविभागात सर्वाधिक १४ घटना समोर आल्या असून अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक निशांत वर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे. वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील जंगलांमध्ये आतापर्यंत आग लागण्याच्या ७६१ घटना घडल्या आहेत.

यादरम्यान गढवालपासून कुमाऊंपर्यंतच्या जंगलामध्ये पसरलेल्या आगीच्या ज्वाला केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या श्री रघुनाथ कीर्ती कॅम्पसमध्ये पोहचल्या. मात्र कॅम्पस डायरेक्टरसह शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत अग्निशमन उपकरणांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवले. पण विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये लागलेल्या आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरले होते. यामुळे काही काळ येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Uttarakhand Forest Fire
fire in Nainital Forest : उत्तराखंडच्या नैनितालच्या जंगलात आग

तसेच द्वारीखल गटांतर्गत येणार्या नापखेतला येथील जंगलात काही समाजकंटकांनी आग लावल्याने ती रस्त्यापर्यंत पोहोचली. याआगीच्या भक्षस्थानी येथे उभी असलेली पिकअप वाहन आणि दुचाकीही जळून खाक झाली. तर येथील लोकवस्तीत आग पोहचण्याच्या आत भूसंरक्षण वनविभागाच्या मटियाली रेंजच्या वनकर्मचाऱ्यांनी ती आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी वनसरपंच ममता देवी यांनी असामाजिक तत्वांविरोधात महसूल पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

यादरम्यान केदारनाथ वन्यजीव विभागाचे एसडीओ जुगल किशोर चौहान यांनी सांगितले की, जंगलातील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच चमोली बाजारातील टॅक्सी स्टँडजवळ आग लागली असून डोंगरावरून दगड पडत आहेत. यामुळे पोलिस प्रशासनाने येथील वाहने हटवली आहेत. गोपेश्वर-नेल-कुडव रस्त्यावरील आग वनकर्मचाऱ्यांनी विझविली असून आता वाहतूक सुरळीत झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com