Agriculture Department: शेतकऱ्यांसाठी दोन लाख उपक्रम राबविल्याची प्रथमच नोंद

MahaKrishi App: खरीप हंगामात राज्यभरात पहिल्यांदाच ‘महाकृषी’ ॲपवर दोन लाख कृषी उपक्रमांची अक्षांश-रेखांशसह छायाचित्रांच्या आधारे नोंद झाली आहे. या डिजिटल पद्धतीमुळे कृषी विस्तारकार्य पारदर्शक, तपासणीय व परिणामकारक बनले आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात कृषी विस्ताराची माहिती देण्यासाठी आतापर्यंत दोन लाख उपक्रम पार पडले आहेत. या उपक्रमांची नोंद अक्षांश-रेखांश छायाचित्रांसह प्रथमच ‘ॲप’मध्ये करण्यात आली, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

वर्षानुवर्षे खरिपाच्या मोहिमांचे नियोजन कागदोपत्री होते व त्या राबविल्याचे अहवाल गाव पातळीवरून येतात. त्यातून अनेकदा मोहीम राबविली नसतानाही अहवाल पाठविले जातात. त्यामुळे राज्यात विस्ताराचे कार्यक्रम होतात की नाही याविषयी सतत शंका असते. यातून प्रामाणिकपणे क्षेत्रीय पातळीवर काम करणारे कर्मचारी नाहक ‘रडार’वर येतात; तर कामचुकार बिनबोभाट राहतात.

त्यामुळे यंदा प्रथमच कृषी आयुक्तालयाने राज्यभरातील क्षेत्रीय कृषी अधिकाऱ्यांना ‘महाकृषी’ उपयोजन (ॲप्लिकेशन) उपलब्ध करून दिले. यातून २८ योजना व कार्यक्रमांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. खरीप हंगामाच्या अनुषंगाने राज्यातील कोणत्याही क्षेत्रीय अधिकाऱ्याने विस्तार कार्यक्रम घेताच अक्षांश-रेखांशच्या नोंदीसह छायाचित्र काढावे व तपशिलासह ते ‘महाकृषी’मध्येअपलोड करावे, असे बंधनकारक करण्यात आले आहे.

Agriculture Department
Agriculture Department: उपसंचालकाला हटविण्याची शिफारस

कृषी सचिव व आयुक्तदेखील क्षेत्रीय भेटीत कार्यक्रम घेतल्यानंतर त्यांची नोंद ‘महाकृषी’मध्ये करीत असून राज्यभर या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे विस्तार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्याचे विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवाडी यांनी सांगितले, की राज्यात ‘महाकृषी- खरीप मोहीम’ ॲप आधारित कामकाज करण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यापूर्वी दोन महिने तयारी करण्यात आली. त्यामुळे क्षेत्रीय पातळीवर होणाऱ्या उपक्रमांची बिनचूक नोंद होऊ लागली आहे. त्यामुळे कृषी विभागाचे काम गावपातळीवर दिसत नाही, असे चित्र आता दिसणार नाही. कारण, या कार्यक्रम राबविल्याच्या नोंदी अक्षांश-रेखांशासहित येत आहेत. आतापर्यंत दोन लाख उपक्रम राज्यभर राबविले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या संकल्पनेमुळे कागदोपत्री वेगळ्या नोंदी किंवा अहवाल ठेवण्याची पद्धत बंद झाली आहे.

Agriculture Department
Agriculture Department: 'कृषी'च्या अधिकाऱ्यांची चौकशी रखडली

खरीप हंगामात आतापर्यंत राबविलेले उपक्रम

उपक्रमाचे नाव एकूण संख्या

बीजप्रक्रिया मोहीम ४०९७०

बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिके ३४३५३

समूह माध्यम गट निर्मिती १७७१९

निविष्ठांचा योग्य वापर १२९२८

जमीन सुपीकता व मृदा आरोग्यपत्रिका वाटप १२५२६

गावनिहाय प्रशिक्षण वर्ग १०८७०

कृषी तंत्रज्ञान माहिती पुरविणे ८९३२

एकात्मिक कीड व्यवस्थापन ८१६२

ग्रामपंचायतीला माहिती देणे ६८६८

खतांचा योग्य वापर ६८६१

बीबीएफ तंत्रज्ञान ६५११

विकसित कृषी संकल्प अभियान ४५४२

जैविक खतांचे उत्पादन ३४७७

पीकस्पर्धा ३२९८

फळबाग लागवड तंत्र ३०८९

शंखी गोगलगाय निर्मूलन मोहीम २४००

खरिपातील पिकांसाठी रोपवाटिका २१७७

कृषी व्यवसाय केंद्र स्थापना १७३५

बायोचार निर्मिती प्रशिक्षण १५०४

पाणी फाउंडेशनच्या डिजिटल शाळा ९०५

गुलाबी बोंड अळी निर्मूलन मोहीम ८४३

भात लागवड तंत्र ८२८

युरिया ब्रिकेटचा वापर ६३३

ऊस पाचट व्यवस्थापन ४२७

आमदारांसोबत बैठका २०२

कृषी निविष्ठा विक्रेत्यांसोबत बैठका ११७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com