Sahkar Bhavan : ‘माफसू’च्या जागेवर आता सहकार भवन

MAFSU : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची मुंबईतील गोरेगाव येथील तीन एकर जागा सहकार भवनाकरिता देण्यासाठी कार्यकारी परिषदेला ठराव घेतला आहे.
MAFSU
MAFSUAgrowon

Nagpur News : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची मुंबईतील गोरेगाव येथील तीन एकर जागा सहकार भवनाकरिता देण्यासाठी कार्यकारी परिषदेला ठराव घेतला आहे. विशेष म्हणजे राजकीय दबावाला झुगारून लावणारे अशी ख्याती असलेले या विभागाचे मुख्य सचिव तुकाराम मुंढे यांनीच हा प्रस्ताव विद्यापीठासमोर सादर केला. परिणामी, या जागेच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी चालवली आहे.

मुंढे यांच्या स्वाक्षरीने कार्यकारी परिषदेच्या बैठकीसमोर जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यात हो किंवा नाही एवढेच मत नोंदविण्याचे अधिकारी सदस्यांना दिले होते. यावर विचार करण्यासाठी वेळसुद्धा देण्यात आली नव्हती. गुरुवारी ११ वाजता ‘माफसू’ विद्यापीठात बैठक बोलावली होती. दुपारी दोन वाजेपर्यंत मंजूर झालेला प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्याचे आदेश अप्रत्यक्षपणे बजावण्यात आले होते, असा देखील आरोप आहे.

MAFSU
MAFSU : म्हशीच्या श्‍वसननलिकेपासून कॉन्ड्रॉयटिन सल्फेट

परिषदेवर नेमलेले सर्वच सदस्य शासननियुक्त असल्याने या प्रस्तावाला विरोध करण्याची हिंमत कोणीच दाखवली नाही. त्यामुळे अतिशय मोक्याची व कोट्यवधी किंमत असलेली जागा सहकार भवन उभारण्यासाठी देण्यास मंजुरी देण्यात आली. कायदेशीर बाबीतून पळवाट शोधता यावी याकरिता प्रस्ताव मंजूर करताना फक्त शैक्षणिक कामांसाठीच जागेचा वापर केला जावा, असे मत प्रस्ताव मंजूर करताना सर्व कार्यकारी परिषद सदस्यांकडून नोंदविण्यात आले.

मात्र आता या जागेच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सत्ताधारी भाजपला घेरण्याची तयारी चालवली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यक्रम नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आता विद्यापीठाची जागाच खासगी संस्थेला देण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यावरूनच सत्तेआड सार्वजनिक मालमत्ता हडप करण्याचे षड्‍यंत्र भाजपकडून रचले जात आहे, असा आरोप नाना पटोले यांनी या पार्श्‍वभूमीवर केला आहे.

MAFSU
MAFSU : ‘माफसू’चे संशोधित तंत्रज्ञान प्रसारात सांघिक प्रयत्नांची गरज

‘देवदत्तचे अध्यक्ष कोण?

देवदत्त सहकारी पर्यटन व वाहतूक संस्थेच्या वतीने बृहन्‍मुंबईतील सहकारी संस्थांकरिता सहकारी भवन उभारण्यासाठी ‘माफसू’चा भूखंड देण्यात यावा असा अर्ज संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आला होता. या अर्जावर संस्थेचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र नावे देण्यात आली नाहीत. ही संस्था भाजपच्या सहकार क्षेत्रातील एका बड्या नेत्याची असल्याचे समजते.

सत्तेत असताना सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्याचे काम काँग्रेसने आजवर केले होते. त्यामुळेच सार्वजनिक संस्था उपक्रमांच्या जागा, संपत्ती साबूत आहे. परंतु भाजपच्या सत्ता काळात सार्वजनिक मालमत्तेची लूट करण्याचे धोरण अवलंबिले गेले. कार्यकारी परिषद सदस्य म्हणून आपलेच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची निवड करायची आणि त्यांच्या माध्यमातून मनमानी ठराव घ्यायचे हेच धोरण सर्व दूर अवलंबिण्यात आले आहे. पशुविज्ञान विद्यापीठाच्या गोरेगाव येथील जागेबाबत घेण्यात आलेला ठराव रद्द करावा यासाठी आम्ही लढा उभारणार आहोत.
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेस

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com