
गोवर्धन पिंगळे, डॉ. पल्लवी देवकाते
Food Industry : विविध नाशिवंत अन्नपदार्थांच्या विशेष गरजांसाठी अधिक किफायतशीर आणि कार्यक्षम पॅकेजिंग तंत्रज्ञान तयार करण्यावर भर दिला जात आहे. संरक्षण पद्धती सुधारून, साठवण कालावधी वाढवून आणि अन्नाच्या गुणवत्तेला टिकवून ठेवून पॅकेजिंग तंत्रज्ञान अन्नसुरक्षा सुधारण्यासाठी आणि अपव्यय कमी करण्यासाठी मदत करते.
मल्टिलेअर पॅकेजिंग म्हणजे उत्पादनांचे संरक्षण, टिकवण क्षमता आणि सादरीकरणासाठी विविध प्रकारच्या सामग्रीच्या अनेक स्तरांचा वापर. यामध्ये प्लॅस्टिक, कागद, अॅल्युमिनियम किंवा इतर सामग्रीचा वापर केला जातो, जे उत्पादनाला धूळ, ओलावा, उष्णता, आणि हवेच्या संपर्कापासून संरक्षण देतात.
यामुळे अन्नपदार्थ, पेय, औषधे, सौंदर्यप्रसाधने यांसारखी उत्पादने दीर्घकाळ सुरक्षित राहतात. टिकाऊपणा, डिझाइनची आकर्षकता आणि ब्रॅण्डिंगसाठी सहजता. मात्र हे पॅकेजिंग पुनर्वापरासाठी कठीण असल्याने पर्यावरणीय समस्या निर्माण होऊ शकते. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पर्यावरणपूरक आणि बायोडिग्रेडेबल मल्टिलेयर पॅकेजिंगच्या विकासावर भर दिला जात आहे, ज्यामुळे भविष्यात याचा प्रभाव कमी होईल.
नवकल्पक पॅकिंगमधील अडचणी आणि संधी
लघू उत्पादकांसाठी प्रगत पॅकिंग तंत्रज्ञान प्रारंभिक अंमलबजावणीसाठी महाग ठरते. याशिवाय, नवीन सामग्री आणि तंत्रज्ञानाचा सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी तपासणी आणि प्रमाणपत्र आवश्यक आहे. काही ग्राहक नवीन पॅकिंग प्रकारांचा स्वीकार करण्यात संकोच करू शकतात, ज्यामुळे स्वीकृतीसाठी शिक्षण आणि जागरूकता मोहिमांचा महत्त्वाचा भाग ठरतो.
काढणीपश्चित नुकसान कमी करण्यासाठी पॅकिंग उपायांवर विशेष संशोधन सुरू आहे. विविध नाशवंत अन्नपदार्थांच्या विशेष गरजांसाठी अधिक किफायतशीर आणि कार्यक्षम पॅकेजिंग तंत्रज्ञान तयार करण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय, पॅकिंग उपायांना पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रणालीसह एकत्रित करणे, अन्नाच्या वितरण प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीत गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ट्रेसिंग आणि वाहतूक सुधारणा शक्य आहे.
टिकाऊपणाला देखील महत्त्वाचे स्थान राहील, पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी इको-फ्रेंडली सामग्रीचा वापर करण्यात लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.नवकल्पक पॅकिंग उपाय नाशवंत अन्नपदार्थांमध्ये काढणीपश्चात नुकसानीला कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. संरक्षण पद्धती सुधारून, साठवण कालावधी वाढवून आणि अन्नाच्या गुणवत्तेला टिकवून ठेवून पॅकेजिंग तंत्रज्ञान अन्नसुरक्षा सुधारण्यासाठी आणि अपव्यय कमी करण्यासाठी मदत करते.
अन्न उद्योगाचा विकास होत असताना, या नवकल्पक उपायांचा स्वीकार करणे आवश्यक ठरणार आहे. यामुळे नाशिवंत उत्पादन ग्राहकांना सर्वोत्तम स्थितीत पोहोचवता येते. या तंत्रज्ञानाच्या विकास आणि व्यापक स्वीकाराला प्रोत्साहन देण्यासाठी अन्न पुरवठा साखळीतील सर्व घटकांचा सहयोग आवश्यक आहे.
- डॉ. पल्लवी देवकाते, ९९२१९०९२७०
(डॉ. शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ एमबीए अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट, बारामती, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.