Sugarcane Fodder : उसाचा चारा उपलब्ध होण्यास सुरुवात

Green Fodder : खानदेशात उसाचे पीक बऱ्यापैकी आहे. त्यात ऊस तोडणी सुरू असून, उसाचा चाराही उपलब्ध होत आहे.
Sugarcane
Sugarcane FodderAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात उसाचे पीक बऱ्यापैकी आहे. त्यात ऊस तोडणी सुरू असून, उसाचा चाराही उपलब्ध होत आहे. ऊस तोडून येणारी बांडी किंवा उसाच्या वरच्या भागातील शेंडा चारा म्हणून विविध गावांत विक्रीसाठी येत आहे.

बांडीचे दर शंभर रुपयांत ३०० कांडी किंवा ३०० नग असे आहेत. बांडीमध्ये पूर्वी १०० रुपयांत ४०० ते ४५० नग किंवा कांडी मिळायच्या. आता त्यातील नगांची संख्या कमी झाली आहे. ऊस लागवड वाढली किंवा स्थिर आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, चोपडा, पाचोरा आदी भागांत ऊस पीक आहे.

Sugarcane
Sugarcane Fodder : उसाची बांडी होतेय दुरापास्त;१०० रुपयांत तिनशेच कांडी

उसाच्या या चाऱ्यास खानदेशात वाढे किंवा बांडी म्हटले जाते. खानदेशात गेली ३० ते ३५ वर्षे उसाचे पीक घेतले जाते. तेव्हापासून बांडी विक्री होते. पूर्वी ही बांडी बरीच स्वस्त मिळत होती. महागाई, टंचाई, वाढती मागणी यामुळे आता ही बांडी महागली आहे. मध्यंतरी ऊस लागवड घटली होती. त्यावेळेस उसाचा चारा दुरापास्त झाला.

खानदेशात चाळीसगाव, यावल, चोपडा, अमळनेर या भागात ही बांडी विक्रीस येते. धुळ्यात शिरपूर आणि नंदुरबारमध्ये शहादा, तळोदा व नवापूर भागातच ही बांडी विक्रीस येते. सर्वत्र ही बांडी उपलब्ध होत नाही. ऊस गाळप वेगात सुरू असल्याने बांडी सध्या मिळत आहे. पुढे किंवा मार्च अखेरीस एक तोटा किंवा बांडीही मिळणे दुरापास्त होईल, असेही चित्र आहे.

Sugarcane
Sugarcane Fodder : मालेगावला ऊस बांडीच्या चाऱ्याच्या आवकेत वाढ

सध्या खानदेशात ऊस तोडणीला गती आली आहे. यामुळे बांडी विक्रीस येत आहे. बैलगाडीतून ऊस तोडणी मजूर ही बांडी विक्रीस आणतात. काही गावांतच ही बांडी विक्रीस येते. बाजारात किंवा अन्य भागात ही बांडी विक्रीस येत नाही. आणखी दोन महिने ही बांडी पशुधनास मिळणार आहे.

१०० रुपयांवर खर्च

पशुपालक किंवा दूध उत्पादक शेतकरी बांडी खरेदी करतात. खानदेशात विविध साखर कारखान्यांच्या क्षेत्रात ही बांडी विक्रीस येत आहे. त्यात १०० रुपयांत ३०० बांडी मिळत आहे. काही भागात ही बांडी खरेदीसाठी शेतकरी प्रतीक्षा करतात.

करण दुधाळ पशुधनास ही बांडी उपयुक्त मानली जाते. यंदा ऊस बऱ्यापैकी आहे. परंतु चारा कमी असल्याने या बांडीचाही तुटवडा दिसत आहे. कारण सध्या शिवारात हिरवा चारा नाही. रब्बी पिकांतून चारा मिळण्यास आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com