Fodder Crisis : सिन्नर, चांदवड, नांदगावमध्ये चाराटंचाईचे संकट

Fodder Issue : नाशिक जिल्ह्यात दुष्काळाचे संकट गडद होत असताना दुसरीकडे चाराटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे
Fodder Shortage
Fodder Shortage Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात दुष्काळाचे संकट गडद होत असताना दुसरीकडे चाराटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. नांदगाव, सिन्नर व चांदवड तालुक्यांमध्ये पशुधनासाठी केवळ दीड महिना पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. तर, जिल्ह्यात ७ लाख १५ हजार टन इतका चारा उपलब्ध असून, तो १५ जूनपर्यंत पुरेल इतका आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. कमी पावसामुळे धरणांमध्ये पुरेसा साठा नाही.

खरीप हंगामातच पुरेसा पाऊस नसल्याने हंगाम वाया गेला होता. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट-सप्टेंबरपासून पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू झाले होते. फेब्रुवारी-मार्चमध्ये तर टँकरने शंभरी गाठली होती. त्यामुळे रब्बी हंगामात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवली. त्यामुळे रब्बी हंगामातील लागवडीखालील पीक क्षेत्रात घट झाली. या परिस्थितीत आवश्यक तो चारा उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी, चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Fodder Shortage
Fodder Shortage : परराज्यांतील जनावरांच्या अडचणीमुळे चाराटंचाईत भर

दुष्काळसदृश परिस्थितीत उन्हाळ्याच्या तोंडावरच जिल्ह्यात चारा टंचाईच्या झळा बरसण्यास सुरुवात झाली. साधारण अडीच महिने पुरेल एवढा चारा शिल्लक असल्याचे पशुसंवर्धन विभागातर्फे सांगण्यात येत आहे. सिन्नर, चांदवड व नांदगाव तालुक्यांत यंदा पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामाला याचा फटका बसला आहे. त्यामुळे चाऱ्याचे उत्पादनही अत्यल्प राहिले. त्यामुळे या तालुक्यांमध्ये केवळ दोन महिने पुरेल एवढाच चारा सद्यःस्थितीत शिल्लक आहे.

जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहण्यासाठी चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली. त्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले. आगामी दोन महिन्यांच्या कालावधीसाठी हा आदेश देण्यात आला आहे. चाराटंचाईची स्थिती लक्षात घेता पशुधनाला चारा उपलब्ध करून देण्यात पशुपालकांची चांगलीच धावपळ होत आहे. अनेक पशुपालकांना हजारो रुपये खर्च करून चारा खरेदी करावा लागतो. वाढता खर्च व चाऱ्याच्या टंचाईमुळे पशुधन सांभाळणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे झाले आहे.

Fodder Shortage
Green Fodder Issue : हिरव्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादनात तब्बल ३० टक्क्यांनी घट

महिन्याला लागतो अडीच लाख टन चारा

जिल्ह्यात १९ लाख ८६ हजार ३०७ इतके पशुधन असल्याची नोंद आहे. या पशुधनासाठी दर महिन्याला दोन लाख ५९ हजार टन इतका चारा लागत असतो. यंदा कमी पर्जन्यमानाचा खरीप व रब्बी हंगामाला फटका बसल्याने पुरेसा चारा उपलब्ध झाला नाही. सद्यःस्थितीत जिल्ह्यात सात लाख १५ हजार टन इतका चारा उपलब्ध आहे. हा चारा आगामी दोन ते अडीच महिने पुरेल इतकाच आहे.

कमी पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामात चाऱ्याचे सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाल्याने जिल्ह्यातील ज्या-ज्या भागात जी लहान-मोठी धरणे, बंधारे, लघुपाटबंधारे आहेत, त्यांच्या गाळपेरा क्षेत्रात चारा बियाणे पेरणी करण्याबाबतच्या सूचना शासन स्तरावरून प्राप्त झाल्या होत्या. या गाळ पेऱ्यात साधारण दोन हजार हेक्टरवर दोन लाख टन चारा उपलब्ध होऊ शकतो, असा अंदाज पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने व्यक्त केला आहे. या गाळ पेऱ्यात पाळीव पशुंसाठी चारा तयार करावा, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी ऑनलाइन बैठकीत दिल्या आहेत.
डॉ. संजय शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com