Animal Fodder : नगर जिल्ह्यात चारा महागला

Fodder Rate Update : आगामी काळात वाढ्यांची विक्री कमी होणार असल्याने हिरवा चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनणार आहे. मका, उसासह अन्य हिरव्या चाऱ्याच्या दरात वाढ होत आहे.
Fodder Rate
Fodder RateAgrowon

Nagar News : नगर जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांचा पट्टा पडलेला आहे. इतर कारखान्यांचेही पट्टे लवकरच पडणार आहेत. त्यामुळे आगामी काळात वाढ्यांची विक्री कमी होणार असल्याने हिरवा चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनणार आहे. मका, उसासह अन्य हिरव्या चाऱ्याच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे पशुपालक जेरीस आले आहेत. बाजारातही नेहमीच्या तुलनेत बाजारात चाऱ्याची आवकही कमी झाली आहे.

Fodder Rate
Animal Fodder : सोलापुरात चारा महागला

नगर येथे दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जिल्ह्यातील विविध भागांतून उसाचे वाढे, मका, ज्वारीचा कडबा, घास आदी चारा विक्रीस येत आहे. यामध्ये कडबा व हिरव्या चाऱ्याला चांगली मागणी आहे. सकाळी आलेल्या हिरवा चाऱ्याची काही वेळातच विक्री होत आहे.

जिल्ह्यात सहकारी व खासगी अशा एकूण २२ कारखान्यांना यंदाच्या वर्षी गाळपास परवानगी होती. त्यातील १२ कारखान्यांचा पट्टा पडलेला असून, उर्वरित कारखान्यांच्या हद्दीतील ऊस संपताच पट्टा पडणार आहे. त्यामुळे आगामी काळात वाढे विक्रीस येणार नसल्याने हिरव्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

Fodder Rate
Fodder Rate : चाऱ्याच्या किमती वाढल्या अन्‌ जनावरांच्या घटल्या

हिरव्या चाऱ्याचे भाव गगनाला

हिरवा चारा बाजारात विक्रीस येत असला, तरी त्याचे भाव गगनाला भिडले आहेत. या अगोदरच वाळलेल्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे जनावरे सांभाळणे अवघड झालेले आहे. त्यातल्या त्यात भाकड जनावरे शेतकऱ्यांना सांभाळणे अवघड झाले आहे. हिरव्या चाऱ्यासह अन्य चाऱ्याचे दर गेल्या सहा महिन्यांचा विचार करता ७०० ते १ हजार रुपये प्रतिटन वाढले आहेत.

चाऱ्याचे दर (प्रतिटन)

उसाचा चारा २५०० ते ३०००

उसाचे वाढे २४०० ते २६००

मका २००० ते २६००

ज्वारीचा कडबा ६०००

घास २३०० (एक हजार पेंढ्या)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com