Fodder Rate : चाऱ्याच्या किमती वाढल्या अन्‌ जनावरांच्या घटल्या

Fodder shortage : मॉन्सून काळात पावसाने पाठ फिरवल्याने मंगळवेढा तालुक्यात हिवाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
Animal feed
Animal feedAgrowom

Latest Agriculture News : मॉन्सून काळात पावसाने पाठ फिरवल्याने मंगळवेढा तालुक्यात हिवाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. खरीप व रब्बीचे दोन्ही हंगाम साधारण गेले. परिणामी चारा वर्गीय ज्वारी व मका पिकांचे उत्पादन कमी झाले.

शिवाय जो चारा पिकला आहे, अशा ज्वारीच्या कडब्याला सांगली व कोल्हापूरच्या शेतकऱ्यांकडून चांगल्या दरात मागणी असल्याने तालुक्यातील शेतकरी कडबा विकून चार पैसे जमवत आहेत.

पण तालुक्यात चाऱ्याच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चाऱ्याअभावी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या जनावरांना कमी किमतीत नाइलाजाने विकावे लागत आहे. दरम्यान, अजून उन्हाळा सुरूही झाला नसताना येवढी भयानक परिस्थिती असेल तर पुढील महिन्यापासून त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Animal feed
Fodder Shortage : खानदेशात चाराटंचाई कायम

दुष्काळी उपाययोजना करा

राज्य शासनाने केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, यात कायम दुष्काळी असलेल्या मंगळवेढा तालुक्याचा समावेश नव्हता. त्यानंतर राज्यातील इतर तालुक्यातून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वाढू लागल्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ७५० मिमीपेक्षा कमी पाऊस पडलेल्या १७८ तालुक्यातील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

यात मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळसदृश तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला. पण त्यानंतर तीन महिने उलटून गेले तरी दुष्काळसदृश परिस्थितीत मिळणाऱ्या शासकीय उपाययोजना मिळत नसल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. राज्य शासन दुष्काळाबाबत गंभीर नाही का? असा सवाल नागरिक करत आहेत.

Animal feed
Fodder Storage : हिंगोली जिल्ह्यात जनावरांसाठी मुबलक चारा

मुरघास देण्याची उपाययोजना कधी

दुष्काळी उपाययोजनेतील प्रमुख आठ उपाय योजनेत जनावरांना पुरेसा चारा व पाणी व्यवस्थापन करणे ही उपाययोजना लवकरात लवकर प्रशासनाने लागू करावी. जनावरांना ओला व वाळल्या चाऱ्याचे नियोजन करावे. त्यासाठी मुरघास वितरण करणे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू करणे अशा मागण्या शेतकऱ्यांमधून होत आहेत.

कडब्याच्या दर वधारला

प्रमुख चारा हा ज्वारीचा कडबा आहे. पण पावसाअभावी ज्वारी कमी पिकली आहे. त्यात बाहेरुन मागणी अधिक असल्या कारणाने ज्वारीच्या पेंडीला १८ रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर दुभत्या जनावरांच्या किमती दीड लाखाहून पन्नास साठ हजारांवर आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com