Agricultural Program : क्रॉपसॅपअंतर्गत क्षेत्रीय भेटींवर भर

Farm Visits : क्रॉपसॅपअंतर्गत तालुक्यातील मौजे किनेश्वर व कापडे बु. येथे गाव बैठक व क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.
Agriculture Field Visit
Agriculture Field VisitAgrowon
Published on
Updated on

Poladpur News : हवामानातील बदलामुळे पोलादपूर तालुक्यातील कापडे परिसरात भातपिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्या दृष्टीने क्रॉपसॅपअंतर्गत तालुक्यातील मौजे किनेश्वर व कापडे बु. येथे गाव बैठक व क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.

कापडे परिसरामध्ये निळे भुंगेरे या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. निळे भुंगेरे ही भातावरील दुय्यम कीड समजली जात असून रोह्यातील कृषी विज्ञान केंद्रातील शास्‍त्रज्ञ जीवन आरेकर यांनी शेतकऱ्यांना भातपिकावरील विविध कीड व रोग यांची ओळख व व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी कृषी पर्यवेक्षक रवींद्र गुंड व कृषी सहाय्यक मोनिका पिसाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहाय्यक कोमल कचरे यांनी केले.

Agriculture Field Visit
Weed Management : गाजर गवत निर्मूलन सप्ताहानिमित्त मेक्सिकन भुंग्याचे वाटप

सध्या भात फुटव्याच्या अवस्थेत आहे. पाणथळ किंवा दलदलयुक्त जमीन आणि खतांच्या अतिरिक्त वापरामुळे निळे भुंगेरेचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही कीड बांधावरील गवतावर आपली उपजीविका करत असल्याने बांध स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. तसेच, भातपिकाची दाट लागवड करू नये, अशा सूचना शेतकऱ्यांना करण्यात आल्या. भुंगे गर्द निळ्या रंगाचे असून अळी भुरकट पांढऱ्या रंगाची असते.

Agriculture Field Visit
Digital Farming : ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’मुळे कृषी क्षेत्रात घडेल क्रांती

भुंगेरे पानाच्या वरच्या पृष्ठभागावरील हरितद्रव्य खातात तर अळ्या पान पोखरून हरितद्रव्य खातात. पानांवर समांतर पांढऱ्या रेषा उमटलेल्या दिसतात. हळूहळू रेषा एकमेकांत मिसळतात व त्या ठिकाणी पांढरा पट्टा तयार होतो. हे पट्टे तपकिरी पडून पाने करपल्यासारखी दिसतात. वाढ थांबून लोंब्या बाहेर येत नाहीत.

परिस्थिती अशीच राहिली तर मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागते की काय, अशीही भीती आता भेडसावू लागली असून वर्षभराच्या रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण होणार असल्याने शेतकरी वर्गाचे संपूर्ण वर्षाचे गणितच बिघडणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com