Dhanesh Bird Conservation : धनेश संवर्धनासाठी देवरूखमध्ये फुलतेय रोपवाटिका

Dhanesh Bird Food : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये धनेश संवर्धनाला चालना मिळावी यासाठी देवरूख येथील धनेशमित्र निसर्ग मंडळ आणि नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशनच्यावतीने धनेश पक्षाचे खाद्य असलेल्या झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dhanesh Bird Food
Dhanesh Bird FoodAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये धनेश संवर्धनाला चालना मिळावी यासाठी देवरूख येथील धनेशमित्र निसर्ग मंडळ आणि नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशनच्यावतीने धनेश पक्षाचे खाद्य असलेल्या झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी रोपवाटिका उभारण्यात आली आहे. त्यामध्ये सध्या तीसहून अधिक प्रजातींच्या बिया रुजत टाकण्यात आल्या आहेत. त्यामधून सुमारे १२०० रोपे तयार होणार आहेत. दोन वर्षे देखभाल केल्यानंतर धनेश पक्षाची घरटी असलेल्या ठिकाणी या रोपांची लागवड केली जाणार आहे.

रत्नागिरीसह सह्याद्री पट्ट्यातील सहा जिल्ह्यांमध्ये महाधनेशाचे संवर्धन करण्यात येत आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी धनेशमित्र निसर्ग मंडळ आणि नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. यासाठी धनेश पक्षाच्या घरट्यांचे निरीक्षण करण्यात आले. यावेळी घरट्याच्या खाली पावसाळ्यात विविध वृक्षांची रोपे उगवून आलेली दिसली. त्यानंतर बिया गोळा करण्याची संकल्पना पुढे आली.

Dhanesh Bird Food
Jowar For Birds : शेतकऱ्याने पक्ष्यांसाठी एकरभर ज्वारी ठेवली राखीव

याबाबत माहिती देताना अभ्यासक प्रतीक मोरे म्हणाले, एका देवराईमधील धनेश पक्षाच्या घरट्याचे निरीक्षण करताना ढोलीखाली चांदफळाची रोपे रुजलेली मिळाली. आसपासच्या दहा-बारा किमीमध्ये चांदफळाचा महावृक्ष कुठेही दिसला नाही. थोडक्यात दूरवरून चांदफळाच्या फळांना घेऊन येऊन त्यांचा बीज प्रसार धनेशामुळे झालेला दिसतो.

‘एनसीएफ'मधील संशोधक रोहित नानिवडेकर यांच्याशी बोलणे सुरू झाल्यावर त्यांनी प्रोत्साहन देऊन धनेशाचे खाद्य असलेल्या फळझाडांच्या रोपवाटिकेची संकल्पना मांडली. अगदी न ओळखू येणाऱ्या अनेक बिया आणि वटकुळातील अनेक वृक्ष रोपे रूजून आल्यावर आरामात ओळखू येतील आणि खाद्य झाडे पुन्हा अधिवासात पुनर्रोपण करून त्यांची घनता वाढवणेसुद्धा शक्य होईल, अशी संकल्पना यामागे आहे.

Dhanesh Bird Food
Maldhok Bird : माळढोकचे रहिवास ठिकाण प्रसिद्ध न करण्याचे आवाहन

अनेक झाडांच्या बिया धनेश पक्षाच्या पचनसंस्थेतून वहन होऊन वेगाने रुजत असल्या तरीही अनेक बियांना सुकण्याआधी रुजविणे गरजेचे असते. देवरूख येथे रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये गोळा केलेल्या बिया रुजत घालण्यात आल्या असून, दोन वर्षात त्यातील रोपे लागवडीयोग्य होतील. सध्या रोपवाटिकेमध्ये १२०० रोपे तयार होणार आहे

रोपवाटिका निर्मितीला गती

धनेश पक्षाच्या संवर्धनासाठी महेंद्र चव्हाण यांची मदत झाली आहे. रोपवाटिका उभारणे, पिशव्या भरण्यासाठी एएसपी महाविद्यालय, देवरूखमधील कृषी शिक्षण घेणाऱ्या मुलांची खूप मदत झाली. ‘एनसीएफ'मधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, धनंजय कोकाटे, मिलिंद पाटील, डॉ.अमित मिरगल यांच्या सहकार्याने रोपवाटिका तयार होत आहे. सह्याद्री संकल्प सोसायटी, शार्दूल केळकर, प्रताप नाईकवडे, सृष्टीज्ञान पर्यावरण शिक्षण संशोधन आणि माहिती संकलन केंद्र, कुणाल अणेराव, प्रशांत शिंदे, अभिजित केतकी, राजापुरातील समीर कुंटे, प्रदीप डिंगणकर, मनोज मराठे, अक्षय मांडवकर, चिपळूणमधील नितीन नार्वेकर यांनी बिया गोळा करण्यासाठी प्रयत्न केले. पूजा पवार यांनी रोपवाटिका उभी करण्यास मदत केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com