Assam Flood : आसाममध्ये पूरस्थिती गंभीरच

Flood News : गेल्या काही दिवसांपासून पुराचा सामना करणाऱ्या आसाममध्ये पूरस्थिती अद्याप गंभीरच असून राज्यातील २२ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.
Assam Flood
Assam Flood Agrowon
Published on
Updated on

Guwahati News : गेल्या काही दिवसांपासून पुराचा सामना करणाऱ्या आसाममध्ये पूरस्थिती अद्याप गंभीरच असून राज्यातील २२ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. सर्व प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी पूरग्रस्त दिब्रुगडची पाहणी केली.

पुराच्या पाण्यात बुडालेल्या दिब्रुगडमध्ये गेल्या गेल्या आठ दिवसांपासून विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला आहे. सरमा यांनी पायी चालत दिब्रुगडमधील काही भागांना भेट देत पूरग्रस्तांशी संवाद साधला. दिब्रुगडमधील पुराच्या समस्येवर समुदाय आधारित तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञ व स्थानिक रहिवाशांची मदत घेतली जात जाईल,’’ असेही सरमा यांनी सांगितले.

Assam Flood
Monsoon Session 2024 : शेती क्षेत्रावरील खर्चात १५ टक्क्यांची कपात

ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने तसेच नाले तुंबत असल्याने दिब्रुगडमध्ये पाण्याचा लवकर निचरा होत नाही. त्यामुळे, पूरस्थिती उद्‌भवते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, पुरामुळे गेले आठ दिवस अंधारात राहणाऱ्याहा दिब्रुगडमधील रहिवाशांनी विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करण्याची विनंती सरमा यांना केली.

Assam Flood
Monsoon Rain : पुढील ५ दिवस पाऊस कसा राहणार ? पावसासाठी काही वातावरणीय प्रणाल्या पोषक ठरत असल्याचा अंदाज

मात्र, पुराच्या पाण्यात विद्युतप्रवाह उतरून दुर्घटना होऊ नये, म्हणून तो बंद ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी रहिवाशांना दिली. मात्र, वीज पुरवठा सुरू करण्याची सार्वजनिक घोषणा करून लोकांना सावध करावे. त्यानंतर तो सुरू करावा, अशी सूचनाही सरमा यांनी अधिकाऱ्यांना दिली.

आसाममध्ये यंदा पुराने कहर केला असून २२ लाख लोक पुरात अडकले आहेत. यात धुब्री जिल्ह्यातील सर्वाधिक ६,४८, ८०६ लोकांचा समावेश आहे. ब्रह्मपुत्रेसह दिगारू, कोलोंग या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

आसाम पाण्यात

पूर आलेले जिल्हे : २९

प्रभावित लोक : २२ लाख

एकूण मृत्यू : ६२

मदत छावण्या : ६९८

आसरा घेतलेले नागरिक : ३९,३३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com