Fish Seeding : उजनी जलाशयात सलग दुसऱ्या वर्षीही सोडले मत्स्यबीज

Ujani Dam : मच्छीमारांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन कोटी रुपये मंजूर करून उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडण्यास गेल्या वर्षीपासून सुरू केले आहे, यावर्षीही मत्सबीज सोडल्यामुळे मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Fish Seeding
Fish Seeding Agrowon
Published on
Updated on

Solapur News : उजनी जलाशय परिसरातील मच्छीमारांचा व्यवसाय मासळीविना रसातळाला गेला होता. मच्छीमारांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन कोटी रुपये मंजूर करून उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडण्यास गेल्या वर्षीपासून सुरू केले आहे, यावर्षीही मत्सबीज सोडल्यामुळे मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यापुढील काळात सोलापूर, पुणे व अहिल्यानगर अशा तीन जिल्ह्यांतून सहा कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांचे मत्स्यबीज सोडून मच्छीमारांचे जीवन समृद्ध होण्यास मदत होणार आहे. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते बीज उजनीत सोडण्यात आले. मत्सबीज उजनीत सोडल्याने मागील वर्षी मच्छीमारांना फायदा झाला आहे. त्यामुळे माशांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.

Fish Seeding
Fisheries Business : गुणवत्तापूर्ण बीजनिर्मिती, बीज संकलन मत्स्य व्यवसायातील यशाचा गाभा

पळसदेव येथे पहिल्या टप्प्यात मत्स्यबीज सोडण्याचा प्रारंभ आमदार भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उजनी मच्छीमार संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक भरत मल्लाव, कुंभारगावच्या सरपंच उज्ज्वला परदेशी, आजोतीचे माजी सरपंच संजय दरदरे, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त विजय शिखरे, सहायक आयुक्त अर्चना शिंदे, उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, मेघराज कुचेकर पाटील, अनिल नगरे, राहुल नगरे आदींसह मान्यवरांच्या हस्ते मत्स्यबीज सोडण्यात आले.

Fish Seeding
Fishery Employment : बक्कळ नफा कमवून देणाऱ्या मत्स्य व्यवसायातील संधी

यावेळी करमाळा तालुक्यातील मच्छीमार बांधव उपस्थित होते. यावेळी मच्छीमारांनी इंदापूर तालुक्यातील बंद झालेले फिशरीज विभाग पुन्हा चालू करावे, मासळी पकडण्यासाठी लागणारी जाळी होडीसाठी अनुदान तत्काळ मजूर करून द्यावे अशी मागणी केली असता, श्री. भरणे यांनी वरिष्ठांशी बोलून तत्काळ मंजूर करून देण्याची ग्वाही दिली.

एकेकाळी उजनी जलाशय म्हणजे गोड्या पाण्यातील मासळीचे मोठे आगर म्हणून राज्यात नावलौकिक होता. मात्र मधल्या २८ वर्षांच्या कार्यकाळात माशांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या. परंतु आपण त्यात जातीने लक्ष घालून कटला, रोहू, मृगल यांसारखे स्कार्प जातीचे मासे सोडून माशांची संख्या आणि पर्यटकांची संख्या वाढून इंदापूर तालुका मोठ्या मासळीचा बोलबाला असणारा तालुका बनवणार आहे, असे आश्‍वासन श्री. भरणे यांनी यावेळी दिले.

मागील वर्षीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने एक कोटी मत्स्यबीज सोडले होते. यावर्षीही लवकरच सोलापूर जिल्ह्यातही (उजनी जलाशयात) टेंडर निघाल्याबरोबर एक कोटी मत्स्यबीज सोडण्यात येणार आहे.
- ॲड. अजित विघ्ने, केत्तूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com