Fisheries
FisheriesAgrowon

Fisheries Business : गुणवत्तापूर्ण बीजनिर्मिती, बीज संकलन मत्स्य व्यवसायातील यशाचा गाभा

Seed Production : गुणवत्तापूर्ण बीजनिर्मिती, बीज संकलन, त्यांची उपलब्धता हा मत्स्य व्यवसायातील यशाचा गाभा आहे. मच्छीमार बांधवांनी कोल्ड स्टोअरेज, मत्स्य विपणन, माशांची बाजारपेठेतील उपलब्धता या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
Published on

Chhatrapati Sambhajinagar : गुणवत्तापूर्ण बीजनिर्मिती, बीज संकलन, त्यांची उपलब्धता हा मत्स्य व्यवसायातील यशाचा गाभा आहे. मच्छीमार बांधवांनी कोल्ड स्टोअरेज, मत्स्य विपणन, माशांची बाजारपेठेतील उपलब्धता या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक, असल्याचे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पॉल हर्बर्ट डीएनए बारकोडिंग विभागाचे संचालक डॉ. जी. डी. खेडकर यांनी व्यक्त केले.

Fisheries
Fishery Business : मच्छीमारी व्यवसाय अडचणीत

पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत लक्ष्मणराव इनामदार नॅशनल ॲकॅडमी फॉर को-ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र, एन. सी. डी. सी, पुणे, सहकार मंत्रालय, भारत सरकार आणि मत्स्य व्यवसाय विभाग, भारत सरकार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पॉल हर्बर्ट डीएनए बारकोडिंग आणि जैवविविधता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छीमारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा गुरुवारी (ता. २२) आयोजित करण्यात आली.

Fisheries
Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

कार्यशाळेस मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. मधुरिमा जाधव, तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे संचालक कर्नल विनीत नारायण यांचे तसेच मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांचे सभासद, मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. डॉ. जी. डी. खेडकर म्हणाले, की मत्स्य व्यवसायात महिलांचे प्रमाण अत्यल्प असून, महिलांनी एकत्र येऊन मत्स्य सोसायट्या स्थापन करायला हव्यात.

या कार्यशाळेत मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे यांनी मत्स्यव्यवसायातील विविध संधी व शासनाच्या मत्स्य व्यवसायविषयक विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सहकारी विकास महामंडळ, पुणेचे उपसंचालक गणेश गायकवाड यांनी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या विविध योजनांची तपशीलवार माहिती दिली. उपसंचालक आक्रुष्टा रितू यांनी मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांसाठी असलेल्या विविध योजनांसाठी प्रस्ताव कसे तयार करावे? यासंदर्भात मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com