Team Agrowon
सागरी किनाऱ्यालगतच्या भागामध्ये पाण्यात शेवाळांची लागवड करण्यास भरपूर वाव आहे. या सागरी शेवाळातून आगर, अल्जिनेट व कॅरेजेनन यासारखी अनेक व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची रसायने उपलब्ध होतात.
बहुतांश वेळा समुद्रातून किंवा गोड्या पाण्याच्या तलावातून पकडलेले मासे अन्य दूरवरच्या भागांमध्ये बर्फामध्ये टाकून पाठवले जातात.
किनारी भागात जोमाने चालणारा व प्रामुख्याने महिलांचे वर्चस्व असलेला हा व्यवसाय आहे. बाजारात कमी दर मिळणाऱ्या किंवा जाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सापडणारे छोटे मासे सूर्यप्रकाशामध्ये पसरून वाळवले जातात.
मासे काढल्यानंतर त्याचे खवले व अनावश्यक टाकाऊ भाग काढून टाकले जातात. उत्तम खाण्यायोग्य भाग बर्फाच्छादित करून विक्री करण्याचा व्यवसायातूनही चांगले उत्पन्न मिळू शकते.
मासा हा अत्यंत नाशिवंत पदार्थ आहे. बाजारात उच्च गुणवत्तेच्या ताज्या मासळीला भरपूर मागणी असते.
मासे व त्यांचे विविध भाग गोठवून विक्री करणे हा परदेशामध्ये चांगलाच फोफावलेला व्यवसाय आहे. भारतासारख्या देशातही त्याला चांगलाच वाव आहे.
कोळंबीच्या कवचांपासून कायटीन, कायटोसन तयार केले जाते. या पदार्थांना रंग उद्योग, कागद उद्योग, औषध उद्योग, सौंदर्यप्रसाधने व पशुखाद्य व्यवसायामध्ये मोठी मागणी असते.