
Chakan News: आषाढी अमावस्या गुरुवारी (ता. २४) असल्याने यानिमित्त मांसाहारी खाद्याचे विशेष बेत अनेकांकडून आयोजित केले जातात. या आखाड पार्टीत मटण, चिकन यावर भर दिला जातो. खरेदीसाठी दुकानावर रांगा लागतात. चिकन, मटणाचे भाव वाढल्याने ग्राहकांचा कल मासे खरेदी करण्याकडे वाढला आहे. त्यामुळे आखाडात माशांचे भाव सरासरी ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत.
मासळीच्या भावाने राज्यात उसळी घेतल्याचे चित्र आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या चिलापीला ग्राहक पसंती देत आहे. ही चिलापी अगदी १०० ते १५० रुपये किलोने बाजारात विकली जात आहे. राज्यात समुद्रातील मासेमारी एक जून ते ३१ जुलैपर्यंत बंद करण्यात आली आहे.
त्यामुळे राज्यातील माशांची आवक अल्प प्रमाणात आहे. माशांच्या खवय्यांना परराज्यातील माशांवर सध्या अवलंबून राहावे लागत आहे. दरम्यानतरीही माशांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मासे खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहे.
पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ओडीसा या राज्यातून आणलेले मासे मुंबईत व राज्याच्या इतर ठिकाणी विक्रीसाठी नेले जातात. परराज्यातून मासे विक्रीसाठी येत असल्याने माशांचे भाव वाढले आहेत. पापलेट या माशाला बाजारपेठेत २२०० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. पापलेट मासा २५०, ३०० ग्रॅम वजनाचा १३०० ते १४०० रुपये प्रति किलो या भावाने विकला जात आहे. हे भाव ३०० ते ४०० रुपयाने महाग आहे. सुरमई मासा १००० रुपये प्रति किलो भावाने विकला जात आहे. तसेच, इतर तळ्यातील, गोड्या पाण्यातील माशांना, खेड्यांनाही मोठी मागणी आहे.
चिलापी खरेदीकडे ग्राहकांचा कल
नदीतील चिलापी माशांना मोठी मागणी आहे. चिलापी मासे प्रति किलो १०० ते १२० रुपये भावाने विकले जात आहेत. चिलापी मासे इतर माशांच्या तुलनेत स्वस्त मिळत असल्याने चिलापी माशांना मोठी मागणी आहे. सर्वसामान्य ग्राहक चिलापी माशांच्या खरेदीकडे वळला आहे. चिलापी माशांना हॉटेलात ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याचे हॉटेल व्यावसायिक दत्तात्रेय खांडेभराड, बाळासाहेब कड यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.