Fish Farming : तलावातील मासे मृत्यू पावल्याने नुकसान

Fish Death : पाणी पातळी कमी होणे व गाळ साचल्यामुळे माशांना ऑक्सिजन कमी मिळाल्याने या माशांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला.
Fish Farming
Fish Farming Agrowon
Published on
Updated on

Jalna News : मच्छिंद्रनाथ चिंचोली (ता. घनसावंगी) येथील लघुसिंचन तलावातील मासे अचानक मृत्यू पावत असल्याने या तलावात मत्स्य व्यवसाय करणाऱ्या भोई समाजाचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हा प्रकार कशामुळे झाला याचा ताळमेळ लागत नसल्याने हतबल भोई समाज बांधवानी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

मच्छिंद्रनाथ चिंचोली (ता. घनसावंगी) येथील लघुसिंचन तलावात गेल्या अनेक वर्षांपासून तेरणा मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या नावाने येथील कैलास खुशालराव होले यांच्यासह इतर जण मत्स्य बीज सोडून व्यवसाय करतात, मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून या तलावातील मासे अचानक मृत्यू पावत आहे.

यातून जवळपास तीस टन मासे मृत झाले आहे. यामुळे २५ लाखांवर नुकसान झाले आहे. भोई समाज बांधवांनी जिल्हा मत्स्य व्यवसाय अधिकारी कार्यालयात तक्रार दिल्यानंतर सहायक जिल्हा मत्स्य व्यावसायिक अधिकारी डॉ. रश्मी सतीश आबुंलकर, कनिष्ठ सहायक श्री हरणे यांनी गुरुवारी (ता. ८) या तलावाला भेट देऊन मृत्यू पावलेल्या माशांची पाहणी केली.

Fish Farming
Fish Farming : मत्स्यव्यवसायाला मिळणार कृषीचा दर्जा

दरम्यान डॉ. रश्मी आंबुलकर यांनी या तलावाचा पंचनामा करून तलावात पाण्याची पातळी खालावली आहे तसेच तलावामध्ये गाळ साचल्याचे देखील दिसून आले. त्याचबरोबर या तलावाच पाणी घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले.

Fish Farming
Fish Farming: मत्स्य उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करा: नीतेश राणे

पाणी पातळी कमी होणे व गाळ साचल्यामुळे माशांना ऑक्सिजन कमी मिळाल्याने या माशांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला. यावेळी तेरणा मत्स्य व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष कैलास होले, लता होले, सोमनाथ होले, राजेंद्र बिडवे, कस्तुराबाई भवरे, अनिता होले यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

पाणीपातळी खालावल्याने माशांना ऑक्सिजन कमी प्रमाणात मिळाल्याने मृत्यू झाला आहे. पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून तपासणी अहवाल आल्यानंतर काय ते निष्पन्न होईल. संबंधित नुकसानभरपाईसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल.
- डॉ. रश्मी आंबुलकर, सहायक जिल्हा मत्स्य व्यवसाय अधिकारी जालना.
मोठ्या अपेक्षेने मत्स्य बीज खरेदी करून या तलावात टाकले होते. या मत्स्यबीज खाण्यासाठी मोठा खर्च केला. जूनच्या पहिल्या अन्यथा दुसऱ्या आठवड्यात हे मासे काढून उत्पन्न मिळण्याची आशा होती. मात्र चार ते पाच दिवसापासून मासे मृत आढळत असल्याने मोठे नुकसान होत आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी. तसेच हा घातपातांचा प्रकार असल्यास संबंधितांवर कारवाई व्हावी.
- कैलास खुशालराव होले, मत्स्य व्यावसायिक मच्छिंद्रनाथ चिंचोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com