Ethanol Supply : ‘कादवा’चा पहिला इथेनॉल टँकर हिंदुस्तान पेट्रोलियमला वितरित

Ethanol Production : दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याचे इथेनॉल निर्मितीचे स्वप्न साकार होत आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार कादवाने ३ लाख ६४ हजार ३८७ लिटर इथेनॉल निर्मिती केली आहे.
Ethanol Supply
Ethanol SupplyAgrowon

Nashik News : दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याचे इथेनॉल निर्मितीचे स्वप्न साकार होत आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार कादवाने ३ लाख ६४ हजार ३८७ लिटर इथेनॉल निर्मिती केली आहे.

कादवाचे इथेनॉल पेट्रोलियम कंपनीकडे वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिला इथेनॉल टँकर हिंदुस्तान पेट्रोलियमला वितरित झाला असून त्याचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांचे हस्ते झाले.

शेटे यांनी सांगितले, की केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालणे शक्य नसल्याने उपपदार्थ निर्मिती अत्यावश्यक आहे. कादवाने भविष्याचा वेध घेत इथेनॉल प्रकल्प हाती घेत सर्वांच्या सहकार्याने प्रकल्प कार्यान्वित झाला. या प्रकल्पामुळे कारखान्याचा फायदा होत स्थैर्य लाभणार आहे.

Ethanol Supply
Ethanol Production : इथेनॉलसाठी १० ते १२ लाख टन साखर वळविण्यास परवानगी द्यावी

बायोगॅस प्रकल्प सुरू झाला असून त्यामुळे बगॅस बचत होणार आहे. कंपोस्ट खत निर्मिती झाली असून त्याचे वितरण सुरू असून सभासदांना उधारीत खत वाटप केले जात आहे. ऊस नोंद व तोडणीचे योग्य नियोजन करण्यासाठी गावनिहाय ऊस उत्पादक यांची समिती स्थापन करून ऊस तोडणीचे नियोजन करण्यात येईल. तसेच जास्तीत जास्त ऊस लागवड करण्याचे आवाहन केले.

या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते, दादासाहेब पाटील, बाळकृष्ण जाधव, शहाजी सोमवंशी, दिनकर जाधव, विश्वनाथ देशमुख, बापूराव पडोळ, सुखदेव जाधव, सुभाष शिंदे, अमोल भालेराव, मधुकर गटकळ, सुनील केदार, राजेंद्र गांगुर्डे, चंद्रकला घडवजे, शांताबाई पिंगळ, भगवान जाधव, संपत घडवजे, निवृत्ती देवरे, नारायण गणोरे, दिलीप शिंदे, बाळासाहेब ढुमणे, उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डमरे, काटा निरीक्षक सिंग,

Ethanol Supply
Ethanol Production : इथेनॉलसाठी जादा साखरेस परवानगीबाबत ‘वेट अँड वॉच’

मातेरेवाडीचे माजी सरपंच राजाराम सोनवणे, सागर गटकळ, भाऊसाहेब उगले, बाळासाहेब महाले, प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर, राज्य बँकेचे निरीक्षक माधव पाटील, प्रशासकीय सल्लागार बाळासाहेब उगले, आर्थिक सल्लागार जे. एल. शिंदे, डिस्टिलरी प्रमुख सावंत, सचिव राहुल उगले, उपलेखापाल सत्यजित गटकळ, चीफ केमिस्ट अर्जुन सोनवणे, युनियन अध्यक्ष भगवान जाधव, कामगार कल्याण अधिकारी गणेश आवारी, युनियन सरचिटणीस अजित दवंगे आदींसह अधिकारी, कामगार उपस्थित होते.

गाळप क्षमता वाढवण्याचा विचार

कादवा कार्यक्षेत्रात एकाचवेळी ऊस लागवड होत असल्याने ऊसतोडीचे नियोजन विस्कळीत होत असून त्यासाठी गाळप क्षमता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. कादवाला ३,५०० गाळप क्षमतेचा परवाना मिळालेला असून कमी दिवसात जास्त गाळप करणे गरजेचे असल्याने गाळप क्षमता वाढवण्याचा विचार करावा लागेल, असे कादवा श्रीराम शेटे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com