Ethanol Production : इथेनॉलसाठी १० ते १२ लाख टन साखर वळविण्यास परवानगी द्यावी

Sugar For Ethanol : यंदाचे साखर उत्पादन फारसे कमी नसल्याने केंद्राने इथेनॉल निर्मितासाठी १० ते १२ लाख टन साखर वळविण्यास परवानगी देण्याची मागणी इंडियन शुगर मिल्‍स असोसिएशनने (इस्मा) केली आहे.
Ethanol Production
Ethanol ProductionAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : यंदाचे साखर उत्पादन फारसे कमी नसल्याने केंद्राने इथेनॉल निर्मितासाठी १० ते १२ लाख टन साखर वळविण्यास परवानगी देण्याची मागणी इंडियन शुगर मिल्‍स असोसिएशनने (इस्मा) केली आहे.

केंद्राला साखर उत्पादनाची वाटते तितकी चिंताजनक स्थिती नसल्याने केंद्राकडून जास्‍तीत जास्त साखर इथेनॉल निर्मितासाठी वळवण्यास परवानगी मिळण्याची अपेक्षा ‘इस्मा’ने व्यक्त केली आहे.

केंद्राने या पूर्वी यंदाच्या हंगामासाठी १७ लाख टन साखर इथेनॉलसाठी वळवण्याला परवानगी दिली आहे. यंदा १५ जानेवारीअखेर साखरेचे उत्पादन १४९ लाख टनांपर्यंत पोहोचले आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत हे उत्पादन १५७ लाख टन इतके झाले होते. यंदा ५२० साखर कारखान्यांनी आपला हंगाम सुरू केला आहे. गेल्‍या महिनाभरातील स्थिती साखर उत्पादनांसाठी अनुकूल ठरली आहे.

Ethanol Production
Ethanol Production : इथेनॉल निर्मितीवरील बंधनांचा फेरविचार करा

उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र व कर्नाटकमध्येही यंदाच्या गळीत हंगामाने वेग घेतला आहे. हंगाम सुरू होण्याअगोदर साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटेल व याचा फटका सर्वांनाच बसेल असा अंदाज व्यक्‍त करण्यात आला होता.

परंतु जसा हंगाम पुढे जातोय तशी अपेक्षित तूट येत नसल्याचे लक्षात आले. महाराष्ट्रासारख्या राज्यात जरी गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी असले तरी जेवढी घट होण्याचा अंदाज व्यक्त होत होता तितकी घट होणार नसल्याची माहिती ‘इस्मा’ने दिली. या पार्श्‍वभूमीवर केंद्राने ही बाब लक्षात घ्यावी, असे संघटनेने म्हटले आहे.

Ethanol Production
Sugar For Ethanol : इथेनॉलकडे ४० लाख टन साखर वळविण्यास वाव

‘इस्मा’च्या सूत्रांनी सांगितले, की नोव्‍हेंबरमध्ये अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. त्याचा सकारात्मक परिणाम साखर उत्पादनावर दिसून येत आहे. यामुळे यंदा साखर टंचाई होईल आणि याचा परिणाम ग्राहकांना सोसावा लागेल अशी भीती सध्या तरी दिसत नाही. अनेक राज्यांच्या साखर आयुक्तांनीही आगामी साखर उत्पादनाच्या अंदाजात ५ ते १० टक्यांनी वाढ केली आहे.

सध्याची स्थिती पाहता शेवटच्या एक-दोन महिन्यात साखरेचे उत्पादन वाढण्‍याची शक्यता साखर उद्योगाने व्यक्त केली आहे. केंद्राने इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातल्याने अनेक इथेनॉल प्रकल्प अडचणीत आले आहेत. या प्रकल्‍पांना दिलासा मिळावा यासाठी साखर उद्योगाने निरंतर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. य अंतर्गत ही मागणी करण्यात आली आहे.

१५ जानेवारी अखेरची साखर उत्पादनाची स्‍थिती (लाख टन)

राज्य साखर उत्पादन साखर उत्पादन

२०२४ २०२३

उत्तर प्रदेश ४५ ४०

महाराष्ट्र ५० ६०

कर्नाटक ३१ ३३

गुजरात ४ ४

तमिळनाडू ३ ३

इतर राज्ये १३ १४

एकूण १४९ १५७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com