Marketing : उत्पादनासाठी शोधा योग्य बाजारपेठ...

Agriculture Marketing : बाजारपेठ ही वेगवेगळ्या गटातील लोकांच्या गरजा आणि अपेक्षेनुसार विभागलेली असते. बाजारपेठेतील आपला स्पर्धक शोधणे, अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. स्पर्धकांच्या किमती, उत्पादन, बाजारातील हिस्सा त्यांची ताकद अन् कमतरता, माल पोहोचविण्याची पद्धत, कमिशन किती देतात याचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Agriculture Marketing
Agriculture Marketing Agrowon

कांचन पुरुळेकर

Market : बाजारपेठ ही वेगवेगळ्या गटातील लोकांच्या गरजा आणि अपेक्षेनुसार विभागलेली असते. बाजारपेठेतील आपला स्पर्धक शोधणे, अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. स्पर्धकांच्या किमती, उत्पादन, बाजारातील हिस्सा त्यांची ताकद अन् कमतरता, माल पोहोचविण्याची पद्धत, कमिशन किती देतात याचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ग्राहकांच्या गरजा या आपले उद्योग, व्यवसाय असतात. त्यामुळे आपण देणार ते ग्राहकाने खरेदी करावे अशी समजूत नको. ग्राहकाला काय हवे, कशामुळे त्याला समाधान व आनंद मिळेल हे लक्षात घेऊन योग्य उत्पादन, योग्य सेवा, योग्य पद्धतीने देऊन ग्राहकाला समाधानी बनविणे या प्रक्रियेला मार्केटिंग म्हणतात. मार्केटिंगची मूलतत्त्वे लक्षात घेऊन बाजारपेठ शोधली पाहिजे.
१) जिथे वस्तू अन सेवांचा विनियोग केला जातो अशी जागा म्हणजे बाजारपेठ. स्थानिक, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आपल्याला साद घालत असते.

आपली ताकद, उपलब्ध साधने, आपली उद्योग कल्पना यावर आपण कोणत्या बाजारपेठेत जायचे ठरवावे लागेल. तेथील लोक काय खरेदी करतात, किती प्रकारच्या वस्तू, सेवा त्यांना हव्या असतात, किती प्रमाणात खरेदी, किती किमतीच्या वस्तूंना मागणी याचा अभ्यास करायला हवा. छोट्या बाजारात ग्राहकाला सरळ प्रश्‍न विचारून तर मोठ्या बाजारात प्रश्‍नावली भरून घेऊन माहिती गोळा करता येते. एजंट, उद्योग विषयक मासिके, व्यापारी पुस्तके यातील आकडेवारी बोलकी असते. तज्ज्ञांची मते, स्पर्धकांच्या विक्री यंत्रणेचे निरीक्षण व विक्रेत्यांची मते यावरूनही अंदाज बांधता येतो.

Agriculture Marketing
Animal Care : योग्य प्रजनन, दूध उत्पादनासाठी समतोल आहार महत्त्वाचा

२) किती प्रकारची उत्पादने त्यांनी बाजारात आणली आहेत? ग्राहक त्याच्या गुणवत्तेबद्दल समाधानी आहे का? ग्राहकाची कोणती गरज स्पर्धक पुरवत नाही? स्वतःच्या उत्पादनाचा सॅम्पल सर्व्हे केला तर बाजारपेठेच्या अभ्यासाचा खरा अनुभव पदरी पडतो.
३) बाजारपेठ वेगवेगळ्या गटातील लोकांच्या वेगवेगळ्या गरजा अन अपेक्षेनुसार विभागलेली असते. भौगोलिकदृष्ट्या विविध ठिकाणी राहणारे लोक, प्रदेशाचा आकार, लोकसंख्या, वातावरण तर दुसरे म्हणजे लोकांचे वय, लिंग, उत्पन्न, कुटुंब आकार, धर्म, राष्ट्रीयत्व, सामाजिक वर्ग यावरही बाजारपेठ अवलंबून असते. लोकांच्या मानसिकतेनुसार बाजारपेठ बदलते. राहणीमानानुसार व्यक्तिमत्त्व, दर्जा, त्यांच्या वस्तू वापराचा दर यानुसारही अभ्यास करावा लागेल.
वरील सर्व बाबी लक्षात घेऊन स्वतःला प्रश्‍न विचारा. वरीलपैकी कोणत्या प्रकारच्या लोकांना मी वस्तू सेवा विकणार आहे? मला स्वतःला कशा प्रकारच्या लोकांना, समाजाला वस्तू, सेवा देणे सोयीचे ठरेल? माझ्या वस्तू/सेवा कोण सहजी खरेदी करेल? त्यासाठी ते किती पैसे मोजतील? याचा विचार करणे आवश्यक आहे.

Agriculture Marketing
Indian Flower Market : भारतीय फुलांची बाजारपेठ केनिया काबीज करेल?

४) बाजारपेठेत आपण वस्तू कशी सादर करणार ही पुढची पायरी आहे. वस्तूची गुणवत्ता, प्रकार, पॅकिंग, एकाच प्रकारची वस्तू बनवणार की यासंबंधी अनेक वस्तू, किंमत किती लावणार? थेट विक्री, एजंट, डीलर, जाहिरात देऊन विक्री करणार का दारोदारी जाऊन का सोशल मीडिया वापरून विक्री करणार? कोणते कॉम्बिनेशन योग्य ठरवावे लागेल.
५) एक दोन यंत्रांच्या साह्याने एकापेक्षा अधिक वस्तू बनविल्यास वस्तूच्या मागणीनुसार उत्पादन कमी जास्त करता येते. उदा. ड्रायर असेल तर भाजीपाला सुकविणे, काजू भाजणे, सुंठ पावडर बनविणे अशी सुकवणूक क्षेत्रातील अनेक उत्पादने गरजेनुसार, मोसमानुसार बाजारात आणता येतात.

Agriculture Marketing
Lumpy Skin : बाधित तालुक्यातील कारणांचा शोधा घ्या

६) बाजारपेठ ही त्रिस्तरीय असते. यामध्ये प्रामुख्याने खालील प्रकार आपल्याला दिसून येतात.
अ) कंझ्युमर मार्केट ः दररोज संपणारे उत्पादन. उदा. साबण, चहा, सर्व खाद्यपदार्थ, इ.
ब) संस्थात्मक बाजारपेठ ः दवाखाने, शाळा, देवालये मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतात.
क) औद्योगिक बाजारपेठ ः कारखाने स्वतःच्या उत्पादनासाठी
विविध प्रकारचा कच्चा माल, सेवा मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.
आपण यापैकी कोणत्या बाजारपेठेत शिरकाव करणार ते ठरवून तुमचे उत्पादन/ सेवा, त्याची योग्य किंमत, विक्रीचे योग्य ठिकाण आणि प्रसार पद्धती नक्की करणे फायदेशीर ठरते.

उद्योगाची सक्षमता ः
आपण उद्योग निवडला, पण त्याची सक्षमता तपासणे आवश्यक ठरते. कारण आपण कर्ज मागणीस अर्ज दिलात तर बँक किंवा शासन हे घटक तपासूनच तुम्हाला साहाय्य देईल. व्यवसायाच्या यशस्वितेसाठी ही चाचणी आवश्यक ठरते. उद्योगाची सक्षमता तपासण्याचे साधारणपणे चार नियम आहेत.
१. उद्योगाची तांत्रिक सक्षमता ः स्वतःलाच पुढील प्रश्‍न विचारा अन् उत्तरे सविस्तर लिहून काढावीत.
अ. उत्पादन/ सेवा/ व्यापार प्रक्रियेची संपूर्ण माहिती आपण घेतली काय?
आ. त्यासाठी आवश्यक जागा आपल्याजवळ उपलब्ध आहे काय? स्वत:ची किंवा भाड्याची जागा.

इ. लागणारी यंत्रसामग्री आणि अवजारे उपलब्ध आहेत ना? मिळण्याची ठिकाणे व किंमत.
ई. कच्चा माल व मनुष्यबळ सहजी उपलब्ध आहे काय?
उ. उत्पादन/ सेवेसाठी बाजारात मागणी आहे ना?
ऊ. भांडवलाची गरज किती? स्वतःचा हिस्सा किती? बँक व अन्य वित्तीय संस्था, शासकीय योजना यातून सहजी किती भांडवल मिळू शकेल?
ऋ. वीज, पाणी, प्रमाणपत्र या गोष्टी सहज उपलब्ध होतील ना?

२) आर्थिक सक्षमता तपासणीसाठी खालील प्रश्‍नांचा विचार करावा.
अ. वस्तू व सेवांना बाजारात मागणी किती?
आ. बाजारपेठेतील सरासरी किमत काय?
इ. आपली नियोजित किमत काय?
ई. नफा किती मिळेल? नफा वाढीची शक्यता?
उ. बँकेचा हप्ता दिल्यानंतर आपल्या हाती किती पैसे राहतील?
ऊ. उरलेल्या पैशातून चरितार्थ भागवून भविष्यासाठी काही तरतूद करता येईल का?

३) उद्योगाची व्यवस्थापन क्षमता तपासा.
अ. यंत्रणा, कामगार, अन्य सहायक आवश्यकतेबाबत पूर्ण माहिती घेऊन आपण या बाबीची तरतूद करू शकणार ना?
आ. वरील गोष्टी सहज हाताळण्यासाठी आपल्या जवळ पुरेसे प्रशिक्षण व माहिती उपलब्ध आहे ना?
इ. उद्योग व्यवस्थेसाठी आवश्यक सर्व बाबींचे समायोजन साधण्यासाठी स्वतः किंवा नेमणूक करावयाचा संघ तत्पर असणार ना?


४) बाजारपेठ मिळविण्यासाठी क्षमता हा सर्वांत कळीचा मुद्दा आहे.
अ. बाजारपेठ मिळविण्यासाठी आपण उत्तम माणसे नेमून बाजारपेठेची मागणी व पुरवठा यावर नियंत्रण ठेवू शकतो का?
आ. बाजारपेठेत शिरकाव करण्यासाठी आपण कोणती जाहिरात पद्धती स्वीकारणार? खर्च/ स्पर्धक/ विक्री/ ग्राहक, यापैकी कशावर आधारित किंमत ठरवून बाजारपेठेत शिरकाव करणार?
इ. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न करणार का?
एकूण आपला उद्योग प्रथमपासून यशोमार्गावर धावायचा असेल तर स्वतःच आपल्या उद्योग निवडीची वरील मुद्यावर चाचणी घेऊन प्रस्ताव तयार करावा. आणखी एक गोष्ट बिनचूकपणे करावी ती म्हणजे कर्ज मागणी, परवाना इत्यादी गोष्टीसाठी सादर करावे लागणारी सर्व कागदपत्रे आपल्याजवळ उपलब्ध आहेत का? आणि त्याची बिनचुकता, विश्‍वासार्हता तपासून ठेवावी.
---------------------------------------------
०२३१- २५२५१२९, : swayamsiddha.parulekar@gmail.com
(लेखिका कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या संचालिका आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com