Indian Flower Market : भारतीय फुलांची बाजारपेठ केनिया काबीज करेल?

Team Agrowon

भारतातील विविध राज्यांसह ‘तळेगाव’ पार्क, मावळ परिसरात १५ वर्षांपासून एकाच प्रकारच्या फुलांचे उत्पादन होते. जागतिक ग्राहकाकडून नव्या रंगांची, वाणांची मागणी होत आहे. अशावेळी केंद्र सरकारने ‘रॉयल्टी’ देऊन नवे वाण उपलब्ध करण्याची गरज निर्यातदारांकडून व्यक्त.

Indian Flower Market | Ganesh Kore

कोरोनावेळी फुलांची कोमेजलेली बाजारपेठ आता फुलत असताना नव्याने
आलेल्या अशा जाचक अटीमुळे निर्यात खर्च वाढल्याची नाराजी निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.

Indian Flower Market | Ganesh Kore

प्रसिद्ध निर्यातदार कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले की कोरोना काळात हे भाडेशुल्क १०० रुपयांवरून प्रति किलो ३५० ते ४०० रुपयांपर्यंत वाढले होते. नंतर ते कमी झाले.

Indian Flower Market | Ganesh Kore

इंधनाच्या वाढलेल्या दरांमुळे हे शुल्क २०० रुपये आहे. त्यामुळे निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. ही पोकळी भरून काढण्यासाठी विविध देशांनी आफ्रिकी देशांतून फुले घेण्यास सुरवात केली आहे.

Indian Flower Market | Ganesh Kore

भारताच्या तुलनेत आफ्रिकी देशांमध्ये विमान भाडेशुल्क कमी आहे. परिणामी केनियातून निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Indian Flower Market | Ganesh Kore

केंद्र सरकारने याबाबत लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा भारतीय फुलांची बाजारपेठ केनिया काबीज करेल अशी भीती निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.

Indian Flower Market | Ganesh Kore
Indian Flower Market | Agrowon