Credit Policy : सर्वसामान्यांना दिलासा नाहीच; रेपो रेट जैसे थे

Credit Policy Committee meeting : देशातील लाखो सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी आशा असताना पतधोरण समितीच्या बैठकीत मात्र याला खो घालण्यात आला आहे. आज झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असून रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
Credit Policy
Credit PolicyAgrowon

Pune News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची म्हणजेच चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू झाली आहे. ही बैठक मंगळवारपासून (६ फेब्रुवारी) सुरू झाली असून आज गुरूवार (८ फेब्रुवारी रोजी) बैठक पुन्हा पार पडली. यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठी घोषणा करत व्याजदरात कोणताही बदल होणार नाहीत अशी घोषणा केली. तसेच रेपो रेट जैसे थे राहतील असेही त्यांनी सांगितले आहे. सध्या रेपो रेट हा ६.५ टक्के होता. तो तसाच राहणार आहे.

येत्या काही दिवसात देशात लोकसभेच्या निवडणूका लागणार आहे. त्याप्रमाणे देशातील सध्याचे मोदी सरकारकडून देशावासियांसाठी अनेक घोषणा अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आल्या होत्या. यानंतर देशातील सर्वसामान्यांच्या नजरा या पतधोरण समितीच्या बैठकीकडे लागल्या होत्या.

Credit Policy
इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडिया- महाराष्ट्र चाप्टरच्या अध्यक्षपदी भंडारी

दरम्यान आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णय आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केले. यावेळी चलनविषयक धोरण समितीने व्याजदरात कोणताही बदल केलेले नाहीत. तर मासिक हप्त्यात देखील (EMI) कोणताही बदल करण्यात आलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. ज्यामुळे सर्वसामान्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

Credit Policy
Revenue Law : महसुली कायद्यांमध्ये सुधारणांसाठी समिती

सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो रेट ६.५ टक्क्यांवर ठेवला आहे. तर याच्याआधी तो ०.२५ टक्का वाढवला होता. तर यंदा मासिक हप्त्यात (EMI) कोणताही बदल झालेला नसल्याने तो व्याज दर ५.२५ ते ५.५ टक्के असणार आहे.

दरम्यान काही अर्थतज्ज्ञांच्या मते व्याजदर कपात ही निवडणूकांच्यानंतर म्हणजे दुसऱ्या सहामाहीत केली जाऊ शकते. पण आता यात बदल होणार नसून याचे कारण हे विदेश व्यापारातील अडथळे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com