Soya Milk Benefits : सोयाबीन दुधाचे आरोग्यदायी फायदे

Soybean Milk For Health : सोया दुधात प्रथिने, कॅल्शिअम आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.बाजारात सोया दुधाचे विविध ब्रँड आणि प्रकार उपलब्ध आहेत.
Soya Milk
Soya MilkAgrowon
Published on
Updated on

अमोल डुकरे,डॉ. जी. एम. माचेवाड

सोया दुधात प्रथिने, कॅल्शिअम आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.बाजारात सोया दुधाचे विविध ब्रँड आणि प्रकार उपलब्ध आहेत. सोया दूध हे स्मूदी, बेकरी पदार्थ आणि क्रिमी सॉससह विविध पाककृतींमध्ये गाई,म्हशींच्या दुधाला पर्याय म्हणून वापरतात.

सोया दूध हे एक स्थिर इमल्शन आहे. रात्रभर भिजवलेले सोयाबीन पाण्याने कुस्करले जाते आणि दूध मिळविण्यासाठी फिल्टर केले जाते. सोया दूध आणि गाईचे दूध यांची रचना अगदी सारखीच आहे. दुधाप्रमाणेच, सोया दूध किंवा साधे सोयाबीन पेय हे फिकट गुलाबी द्रव आहे, जे प्रथिने आणि इतर पोषक तत्त्वांनी युक्त असते. गाई,म्हशीच्या दुधापेक्षा सोया दुधाचा एक फायदा म्हणजे, या दुधात लॅक्टोज किंवा कोलेस्टेरॉल नसते.

Soya Milk
Soybean Processing : सोयाबीन प्रक्रियेतील संधी...

सोयाबीन १:३ प्रमाणात पाण्याचे गुणोत्तर घ्यावे. कोमट पिण्यायोग्य पाण्यात १८ तास सोयाबीन रात्रभर भिजवून ठेवले जाते. खोलीच्या तापमानावर सोयाबीन भिजवताना, ०.५-१ टक्का सोडिअम बायकार्बोनेट द्रावण वापरले जाते.

त्यानंतर सोयाबीन पाण्यातून काढावे. पिण्याच्या पाण्याने धुऊन ५ मिनिटे उकळत्या पाण्यात ब्लँच केले जाते. ब्लँच केलेले बीन्स ब्लेंडरमध्ये पिण्यायोग्य पाणी मिसळून दळले जाते. ही स्लरी कापडातून चाळून घेतली जाते आणि तयार झालेले दुधासारखे द्रावण १५ मिनिटे उकळले जाते.

आरोग्याचे फायदे ः

सोया दुधातील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. सोया दुधात आढळणारे जीवनसत्त्व ब चेतापेशी आणि डीएनए राखण्यात मदत करण्यासाठी महत्त्वाचे आहे. अशक्तपणा टाळण्यास मदत करते. ज्यामुळे थकवा टाळता येतो.

सोया दुधात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. सोया दुधातील प्रथिने निरोगी, वनस्पती-आधारित आहेत आणि निरोगी स्नायू आणि अवयवांना मदत करतात.

सोया दुधामध्ये आयसोफ्लाव्होन आणि सॅपोनिन्स असतात ज्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. हे खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. चांगले कोलेस्टेरॉल वाढवू शकते. सोया दूध हे फॅट्स जमा होण्यास विलंब करून फायदेशीर ठरू शकते.

सोयामध्ये आयसोफ्लाव्होनच्या उपस्थितीमुळे कर्करोगविरोधी गुणधर्म असू शकतात. आयसोफ्लाव्होन पेशी चक्रात बदल करू शकतात. सोया दूध प्रोस्टेट, पोट, फुप्फुस आणि कोलन कर्करोगाचा धोका कमी करू शकतो.

Soya Milk
Soybean Processing : सोयाबीनपासून दूध, टोफू, सोया पीठ, सोया तेल निर्मिती

सोया दूध महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करू शकते, ज्यांच्या हाडांची खनिज घनता इस्ट्रोजेन आणि हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी सारख्या हार्मोन्समध्ये घट झाल्यामुळे कमी होते. सोया दुधातील आयसोफ्लाव्होनमुळे हाडांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण वाढू शकते. यामध्ये उच्च प्रथिने हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी सोया दूध चांगले आहे. कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते.

सोया दूध प्रीबायोटिक म्हणून काम करून आणि आतड्यांमधील उपयुक्त सूक्ष्मजंतू वाढवून आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते. सोयामधील ऑलिगोसॅकराइड्स साखरेला पर्याय म्हणून मदत करतात जे चांगले जिवाणू वाढण्यास आणि उपयुक्त जिवाणू टिकवून ठेवण्यासाठी आतड्याला मदत करतात. आतड्यात असलेले हे जिवाणू चयापचय प्रक्रियेत मदत करू शकतात.आतड्याचे योग्य कार्य करण्यास मदत करू शकतात.

दही :

सोया दही बनविण्याची प्रक्रिया पारंपरिक पद्धतीसारखीच आहे. सोया दही हे लॅक्टिक ॲसिड जिवाणू, प्रामुख्याने लैक्टोबॅसिलस बल्गेरिकस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलससह पाश्चराइज्ड सोया दूध आंबवून तयार केले जाते.

टोफू:

टोफू हे पनीरशी साधर्म्य साधणारे आहे, गाई किंवा म्हशीच्या दुधापासून बनवलेले भारतीय दुग्धजन्य पदार्थ. टोफू करताना सोया दुधात मीठ किंवा सायट्रिक आम्ल वापरतात.

अमोल डुकरे, ९३७०८५१५९९ (अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com