Cow Milk Subsidy
Cow Milk Subsidyagrowon

Cow Milk Subsidy : दूध अनुदानासाठी बोगस नावे असल्याचा संशय

Milk Rate : गाईच्या दुधाला शासनाकडून अनुदान दिले जात आहे. मात्र त्यासाठी ऑनलाइन भरलेल्या माहितीत एकाच कुटुंबातील अधिक नावे असल्याचे दिसून आले.
Published on

Ahilyanagar News : गाईच्या दुधाला शासनाकडून अनुदान दिले जात आहे. मात्र त्यासाठी ऑनलाइन भरलेल्या माहितीत एकाच कुटुंबातील अधिक नावे असल्याचे दिसून आले. त्यामुळे जनावरे व दूध नसतानाही बोगस नावे तर नाहीत ना असा संशय आल्याने जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी सबंधित शेतकऱ्यांकडे नोंदणी केल्याप्रमाणे जनावरे आहेत का याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पशुखाद्य, चाऱ्याचे वाढते दर आणि गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मागील काळात अंदोलन केले. शेतकरी नेते, संघटना दुधाला दर मिळावा यासाठी अक्रमक होत्या. शेतकऱ्यांतील तीव्रता पाहून शासनाने पहिल्यांदा ११ जानेवारी ते १० मार्च २०२४ या काळात त्यानंतर १ जून ते ३० सप्टेंबर २०२४ अशा दोन टप्प्यात अनुदान दिले.

Cow Milk Subsidy
Milk Subsidy : गणेश सहकारी दूध संस्थेच्या सर्व गवळ्यांना अनुदान वितरित

त्यानंतर पुन्हा १ आक्टोबरपासून तिसरा टप्पा सुरू आहे. पहिल्यांदा पाच रुपये अनुदान व तीस रुपये दर होता. त्यानंतर २८ रुपये खरेदी दर व ७ रुपये प्रतिलिटर अनुदान असे सूत्र ठरले आहे. किमान ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ असलेल्या दुधाला हे अनुदान दिले जात आहे. राज्यातील एकूण दूध संकलनात एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात वीस टक्के दूध संकलन होत आहे.

शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर हे अनुदान वितरित केले जात असून त्यासाठी दूध संकलन केंद्रचालकांकडून सबंधित शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती व उत्पादित दुधाची माहिती ऑनलाइन भरली जात आहे.

Cow Milk Subsidy
Cow Milk Subsidy : राज्यातील ४ लाख ५३ हजार दूध उत्पादकांच्या खात्यात १८५ कोटी जमा

त्याची पशुसंवर्धन विभाग कार्यालयात पडताळणी करून नंतर अनुदानास पात्र-अपात्र ठरवले जाते. त्यासाठी सबंधित गाईंना टॅग लावलेले असून त्याची नोंदणी केली जाते. पशुसंवर्धन विभागाकडे आलेल्या माहितीत अनेक नावे एकाच कुटुंबातील असून काही नोंदी नातेवाईकांच्या नावे असल्याचा संशय आहे.

पोर्टलवर नोंदी केलेल्या नावांत काही नावे एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे बोगस नोंदी करून अनुदान लाटण्याचा प्रयत्न होत नाही ना याबाबत आम्हाला संशय होता. त्यानुसार पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.
- डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com