Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Soybean Production : सततच्या मुसळधार पावसाने सोयाबीन पिकाला जास्त पाणी झाले आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
Soybean Crop
Soybean CropAgrowon
Published on
Updated on

Satara News : सततच्या मुसळधार पावसाने सोयाबीन पिकाला जास्त पाणी झाले आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. काही पाण्याच्या जमिनीत सोयाबीन उगवले; पण ते गुडघाभर माजले, त्याला शेंगाच आल्या नाहीत, तर काही ठिकाणी फक्त काड्याच शिल्लक राहिल्या आहेत. बहुतांश सोयाबीन पिवळे पडले आहे, त्यामुळे जावळी तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

जावळी तालुक्यातील १५ ते २० हजार हेक्टर सोयाबीनचे पीक आहे. अलीकडच्या काळात बटाटा, भुईमूग ही पिके कमी होऊन याठिकाणी सोयाबीनचे प्रमाण वाढले आहे. दोन वर्षांपासून चांगले उत्पादन येऊनही दराने शेतकऱ्यांना मारले. यंदाही अतिपावसाचा पिकाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

Soybean Crop
Soybean Crop Issue : नांदेडला पक्वतेपूर्वीच सोयाबीन झाले पिवळे

दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या हाती लागत असते. सोयाबीनची विक्री करून हा सण साजरे करण्याची पद्धत सुरू झाली आहे; परंतु याच पिकातून समाधानकारक उत्पन्न हाती पडत नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत जात आहे. यंदाचे चित्रही यापेक्षा वेगळे नसणार, असे शेतकरीच आतापासून बोलत आहेत.

मुळात सोयाबीनला आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी लागले आहे. शेंगा लागण्याच्या कालावधीत उन्हाची गरज असताना अधूनमधून पावसाचा खेळ सुरू होता. यामुळे काही ठिकाणी शेंगा आल्याच नाहीत, तर काही ठिकाणी एक-दोन शेंगा आल्या आहेत. शेंगातील दाणे अपेक्षेनुसार धरतात की नाही, याची शंका व्यक्त होत आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात तर शेंगाच आल्या नाहीत. नुसते पीक माजले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.

Soybean Crop
Soybean Crop Disease : सोयाबीन पिकातील करपा रोगाचे व्यवस्थापन

जावळीतील नुकसान झालेल्या सोयाबीनचे पंचनामे झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, रुईघर, काटवली, बेलोशी, दापवडी, कुडाळ, करहर, खर्शी, रामवाडी, हुमगाव, आलेवाडी, इंदवली, म्हसवे या भागांत सोयाबीन घेतले जाते; परंतु अद्यापही या भागात कसलेच पंचनामे झाले नाहीत.

सततच्या आणि अतिपावसाने पिके हातची जात आहेत. उन्हाची तिरीप न मिळाल्याने सोयाबीन मात्र भरले नाही, त्यामुळे यावर्षी आमचा खर्च तरी निघतो का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने सोयाबीनसह इतर पिकांचे सरसकट पंचनामे करून मदत देणे गरजेचे आहे.
- राजेंद्र बेलोशे, शेतकरी, काटवली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com