Agriculture Department : ज्यांच्या जीवावर पगार घेतो त्यांची जाणीव ठेवलीच पाहिजे

Dr. Kailas Mote : राज्यातील आव्हानात्मक कृषी प्रकल्पांची कामे तांभाळे यांनी स्वीकारली व यशस्वी करून दाखवली. ते लोकाभिमुख व चौकटीबाहेर विचार करीत कृषी खात्यात काम करीत राहिले.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Pune News : ‘‘शेतीसमोरील आव्हाने वाढली आहेत. मात्र, तरीदेखील ज्यांच्या जिवावर आपण पगार घेतो, त्यांची जाणीव ठेवलीच पाहिजे. कृषी खात्याकडून शेतकऱ्यांच्या सेवा देण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध रहायला हवे,’’ असे उद्गार राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते काढले.

कृषी आयुक्तालयाच्या पद्मश्री सभागृहात शुक्रवारी (ता. ३१) आयोजित केलेल्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात ते बोलत होते. कृषी आयुक्तालयाचे प्रक्रिया संचालक सुभाष नागरे, ‘आत्मा’चे संचालक दशरथ तांभाळे, मृद्संधारण सहसंचालक पांडुरंग शेळके, प्रशिक्षण उपसंचालक हणमंत शिंदे, कृषी अधिकारी नानासाहेब राऊत व पोपट चिपाडे यांचा निवृत्ती निमित्ताने सत्कार करण्यात आला.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी आयुक्त गेडाम यांची तडकाफडकी बदली

या वेळी गुणनियंत्रण संचालक विकास पाटील, मृद्संधारण संचालक रवींद्र भोसले, सहसंचालक विनयकुमार आवटे, अशोक किरन्नळी, सुनील बोरकर, रफिक नाईकवडी आदी उपस्थित होते.

डॉ. मोते म्हणाले, ‘‘राज्यातील आव्हानात्मक कृषी प्रकल्पांची कामे तांभाळे यांनी स्वीकारली व यशस्वी करून दाखवली. ते लोकाभिमुख व चौकटीबाहेर विचार करीत कृषी खात्यात काम करीत राहिले.

शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी त्यांनी दिलेले योगदान यापुढेही मार्गदर्शक ठरेल. नागरेंनी त्यांच्या कामातून राज्यभर शेतकरी जोडले. शेततळ्यांची उभारणी केली. प्रक्रिया विभागाला राष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवून दिला.

शेळकेंनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेसह इतर योजनांमध्ये उत्तम काम केले. शिंदे यांनी सोपविलेले कोणतेही काम उत्तमरीत्या पार पाडले. कृषी खात्यात अधिकारी एकोप्याने काम करतात. त्यामुळेच रफिक नाईकवाडी यांनी आपल्या सर्वांसाठी पाठपुरावा केला व वर्षानुवर्षे रखडलेल्या पदोन्नत्यांचा प्रश्न मार्गी लावला.”

‘‘अनेक अनुभवी अधिकारी यंदा निवृत्त होत आहेत. एकप्रकारे कृषी खात्यातील मनुष्यबळाची मालमत्ता आपल्यातून निघून जाते आहे. त्यामुळे पुढील काळात प्रशासनातील आव्हाने वाढणार आहेत. समस्या असल्या तरी शेतकऱ्यांसाठी आपण सर्वांनी गुणवत्तापूर्ण सेवा देत आव्हानांना सामोरे जायचे आहे,’’ असेही डॉ. मोते यांनी नमुद केले.

Agriculture Department
Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

श्री. भोसले म्हणाले, ‘‘आयुक्तालयातील व क्षेत्रिय पातळीवरील अधिकाऱ्यांच्या निवृत्तीमुळे कृषी खात्यात मोठी पोकळी तयार होणार आहे. त्यामुळे रिक्त पदांवर आता नव्याने येत असलेल्या अधिकाऱ्यांवरील जबाबदारी वाढेल.’’

‘‘अनुभवी व चांगले अधिकारी निवृत्त होत असताना संस्थेची हानी होत असते. ही बाब वाईट असली तरी आपण सर्वांनी कृषी खात्याचे बदलते रुप स्वीकारून उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे,’’ असे श्री. पाटील म्हणाले.

‘दोन पैशांसाठी त्रास देऊ नका’

श्री. चिपाडे यांनी व्यक्त केलेले मनोगत चर्चेचे ठरले. “राज्यातील शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कृषी खाते आहे. संकटात असलेला शेतकरी आशाळभूतपणे आपल्याकडे बघत आहे. त्यामुळे दोन पैशांसाठी त्यांना त्रास होईल, असे काहीही करू नका. त्यांना चांगली सेवा द्या,” असे आवाहन त्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com