Lok Sabha Election 2024 : पुणे, बारामती, शिरूर, मावळमध्ये होणार कडवी लढत

Election Update : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आहे.
Loksabha Election
Loksabha ElectionAgrowon

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील केवळ पुणे आणि शिरूरमधून अनुक्रमे भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे.

मात्र इतर उमेदवार जाहीर होण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बैठकांचा खल सुरू आहे. येत्या दोन दिवसांत सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर होऊन, खऱ्या अर्थाने प्रचाराच्या तोफा धडाडणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघासाठी १३ मे, रोजी तर बारामतीसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. यामुळे चारही मतदारसंघांतील उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

पुणे मतदारसंघ

पुणे शहरात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांनी प्रचार सुरू केला आहे. त्यांनी नुकतेच त्यांचे प्रतिस्पर्धी आणि इच्छुक उमेदवार हडपसरचे माजी आमदार जगदीश मुळीक यांची आणि नुकत्याच राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांची भेट घेऊन, साखरपेरणी केली. मोहोळ यांच्या विरोधात कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी काँग्रेसकडून नक्की मानली जात आहे. यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यावर पुण्याची लढत लक्षवेधी ठरणार आहे.

Loksabha Election
Loksabha Election : ‘शेकाप’ला हव्यात माढा हातकणंगलेच्या जागा

बारामती मतदारसंघ

बारामती मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे (नणंद) आणि सुनेत्रा पवार (भावजय) यांची लढत अंतिम मानली जात आहे. या लढतीकडे देशाचे लक्ष लागले असून, भाजपने ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. या लढतीत शरद पवार कुटुंबीय विरोधात अजित पवार कुटुंबीय अशी लढाई असणार असून, ही लढत भावना आणि विकासावर लढली जाण्याची शक्यता आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अगोदरच भावनेऐवजी विकासकामांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे बारामतीकर जनता भावनेला मत देणार, की विकासाला हे पाहावे लागणार आहे.

शिरूर मतदारसंघ

शिरूरमध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवार अंतिम असून, त्यांच्या विरोधात शिवसेना (शिंदे गटाचे) शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी (अजित पवार) गटात प्रवेश करून घड्याळ चिन्हावर लढण्याचे अंतिम मानले जात असून, केवळ घोषणा होणे बाकी आहे. या लढतीत निष्क्रिय खासदार ते मतदारांना सदैव उपलब्ध माजी खासदार असा मुद्दा प्रचाराचा होऊन, लढत रंगणार आहे.

Loksabha Election
Loksabha Election : आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत घेतले १७ निर्णय

मावळ मतदारसंघ

मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि नुकतेच शिवसेना ठाकरे गटात सहभागी झालेले माजी महापौर संजोग वाघेरे यांची लढत अंतिम मानली जात आहे. वाघेरे यांच्या घराण्याला मोठी राजकीय परंपरा असून, वाघेरे यांचे वडील, स्वतः वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार कुटुंबाशी ऋणानुबंध असलेले कुटुंब आहे.

वाघेरे यांची पत्नी देखील नगरसेविका आणि स्थायी समिती सदस्या होत्या. त्यामुळे ही लढत देखील लक्षवेधी ठरणार असून, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ पवार देखील ठाकरे गटात दाखल झाल्याने याचा दुहेरी फायदा शिवसेना ठाकरे गटाला मिळण्याच्या शक्यतेने वाघेरे हे कडवी लढत देण्याची शक्यता आहे.

मनसेची रसद महायुतीला?

मनसे महायुतीमध्ये सामील होण्याची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. मनसे महायुतीत आल्यावर त्याचा फायदा महायुतीच्या सर्व उमेदवारांना मिळाल्यास महायुती अधिक बळकट होण्याची चिन्हे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com