Agriculture Seeds : बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे पावणेपाच लाख क्विंटल घरचे बियाणे

Kharif Season : शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी राखून ठेवलेले बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये विविध वाणांचे सुमारे चार लाख ७५ हजार क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.
Soybean Seeds
Soybean SeedsAgrowon

Buldhana News : या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली. शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी राखून ठेवलेले बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये विविध वाणांचे सुमारे चार लाख ७५ हजार क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.

प्रत्येक वर्षी नवीन बियाणे खरेदी करूनच पेरणी करणे आवश्यक नाही. सोयाबीन या पिकांमध्ये स्वपराग सिंचन होत असल्याने कोणतेही संकरित वाण उपलब्ध नाही. त्यामुळे सरळ वाणांचे बियाणे एकदा विकत घेतल्यानंतर त्यापासून तयार होणारे बियाणे पुढे दोन वर्षे बियाणे म्हणून वापरता येते.

Soybean Seeds
Cotton Seed Sales : जादा दराने कपाशी बियाणे विक्रीविरुद्ध ‘कृषी’ची धडक मोहीम

त्यामुळे अनावश्यकपणे बाजारामधून दरवर्षी बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन राखून ठेवले आहे. हे बियाणे आता हंगामाच्या दृष्टीने विक्रीसाठी खुले करण्यात आले आहे.

Soybean Seeds
Soybean Seed : सोयाबीन बियाण्याची महागाई, हमीचा अभाव

या जे. एस ३३५ एक लाख ५० हजार १०६ क्विंटल, फुले संगम १ लाख ३५ हजार ४१५, फुले किमया ६४ हजार ५५६, एमएयुएस ६१२ चार हजार ८२, एएस ९३०५ हे बियाणे २९ हजार १३५, एमएयूएस ७१ वाणाचे बियाणे १० हजार ५१२,

एमएयुएस १६२ वाण नऊ हजार २२३, पीडीकेव्ही-अंबा ८८९ क्विंटल, फुले दुर्वा केडीएम ९९२ वाणाचे १ हजार २२८, जेएस ९५६० वाणाचे ७९२, ३३४४ चे ७२५ क्विंटल, एमएयुएस ११८८ वाणाचे ४२८ इतर खासगी वाण मिळून ४ लाख ७५ हजार ५०९ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com