Crop Management : सद्यःस्थितीत कापूस, सोयाबीन पिकाची घ्यावयाची काळजी

Kharif Crop : कापूस आणि सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही भागात अधून-मधून सुरू असलेल्या पावसामुळे अडचणी येत आहेत. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
Crop Management
Crop ManagementAgrowon
Published on
Updated on

Crop Harvesting : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदलते हवामान, पावसाची उघडझाप आणि ढगाळ वातावरण दिसून येत आहे. यामुळे खरिपातील कापूस, सोयाबीन आणि तूर या प्रमुख पिकांवर अजैविक ताण पडत असून, त्याचा पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम दिसून येतो. तसेच जमिनीतील अतिरिक्त ओलावा आणि वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेमुळे मूळकुज, खोडकुज आणि अन्य बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Crop Management
Crop Management : बदलत्या हवामानात पिकांची काळजी कशी घ्याल?

कापूस पीक

या पिकाला उत्तम वाढीसाठी पुरेसा स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक आहे. सोबतच शिफारशीत खतांची मात्रा झाडाच्या बुंध्यापासून किमान ४ बोटे (५ सेंमी) अंतरावर द्यावी. म्हणजे खताच्या उष्णतेमुळे पिकाच्या मुळांवर व खोडावर विपरीत परिणाम होत नाही.

शक्यतो कोणत्याही वाढ संजीवकांचा वापर अशा परिस्थितीमध्ये टाळावा.

कापूस पिकामध्ये शेतात जास्त काळ पाणी साचून राहिल्यास झाडांच्या मुळांना पुरेशी खेळती हवा न मिळाल्यामुळे पीक पिवळे पडते. किंवा बुरशींच्या प्रादुर्भावामुळे मूळकुज किंवा खोडकुज रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतात अतिरिक्त पाण्याचा निचरा करून घ्यावा.

सतत पाऊस, ढगाळ वातावरण आणि शेतामध्ये साचलेले पाणी यांचा पिकावर अजैविक ताण पडतो. कापूस पिकावर आकस्मिक मर विकृतीचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता जमिनीची आंतरमशागत म्हणजेच डवरणी किंवा खुरपणी करावी. त्यामुळे पिकांच्या मुळांना खेळती हवा उपलब्ध त्यांचे कार्य व्यवस्थित सुरू होईल.

पीक ५५ ते ६० दिवसांचे झाल्यानंतर अर्धवट उमललेली फुले किंवा गुलाबाच्या कळी सारखी बंद झालेली फुले (डोमकळ्या) आढळल्यास अशी फुले किंवा डोमकळ्या तोडून त्यातील गुलाबी बोंड अळीसह नष्ट करावीत.

तण नियंत्रणासाठी शक्यतोवर डवरणी किंवा खुरपणी करावी. शेत तण मुक्त ठेवावे.

मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या रसशोषक किडींच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता एकरी किमान ४० पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.

किडींचा प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव आढळून येताच ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

फवारणी वा ड्रेंचिंगसाठी पाण्याचा सामू ६ ते ७ दरम्यान असणे गरजेचे आहे.

वेगवेगळ्या रसायनांचे किंवा कीडनाशकांचे मिश्रण करून फवारणी करणे प्रकर्षाने टाळावे.

Crop Management
Summer Soybean : उन्हाळी सोयाबीन पीक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

तूर पीक

ज्या ठिकाणी पाऊस व अन्य कारणामुळे पेरण्या झालेल्या नाहीत किंवा पीक वाहत्या पाण्यासोबत वाहून खरडून गेले आहे, अशा ठिकाणी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तूर पिकाची लागवड करणे शक्य आहे.

सोयाबीन पीक

सध्याच्या वातावरणाचा अजैविक ताण पिकावर वाढून ते पिवळे पडण्याची शक्यता आहे. तसेच बुरशीजन्य मूळकुज किंवा खोडकुज रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्या व्यवस्थापनासाठी

शेतात साचलेल्या पाण्याच्या निचरा करून घ्यावा.

एकरी किमान ४० पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर केल्यास रसशोषक किडी मावा, तुडतुडे, पांढरी माशी आटोक्यात राहण्यास मदत होते.

शेत तणमुक्त ठेवावे.

सोयाबीन पिकामध्ये किडींचा प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव आढळून येताच ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाणी अशी फवारणी करावी.

खोडमाशी व चक्रभुंगा किडीने आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडल्यास, व्यवस्थापनाकरिता फवारणी प्रति लिटर पाणी

इथिऑन (५० टक्के ईसी) १.५ ते ३ मिलि किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि किंवा थायामेथोक्झाम (१२.६ टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ टक्के झेडसी) (संयुक्त कीडनाशक) ०.२५ मिलि (लेबल क्लेम.)

तंबाखूचे पाने खाणारी अळी, हिरवी उंट अळी या किडीने आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी फ्लूबेंडायअमाइड (३९.३५ टक्के एससी) ०.३ मिलि किंवा

इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ०.६७ मिलि किंवा क्लोरॲन्ट्रानिलप्रोल (९.३० टक्के) + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.६ टक्के झेडसी) (संयुक्त कीडनाशक) ०.४ मिलि असा वापर करावा.

(लेबल क्लेम आहे.)

फवारणी करताना पाण्याचा सामू ६ ते ७ दरम्यान असावा.

डॉ. प्रमोद नागोराव मगर, (विषय विशेषज्ञ -कीटकशास्त्र), ७७५७०८१८८५

डॉ. सुरेश नेमाडे, (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख), ९४२१७७१३७४

(कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com