Fertilizer Shortage
Fertilizer ShortageAgrowon

Fertilizer : संजयनगरमध्ये विनापरवाना विक्रीचे १.३४ लाखाचे खत जप्त

Agriculture Department : शहरातील संजयनगर येथील ‘फर्टिलायझर वर्ल्ड’ येथे विनापरवाना खत विक्री केल्याप्रकरणी कृषी विभागाने कारवाई केली.
Published on

Sangli News : शहरातील संजयनगर येथील ‘फर्टिलायझर वर्ल्ड’ येथे विनापरवाना खत विक्री केल्याप्रकरणी कृषी विभागाने कारवाई केली. दुकानातील १ लाख ३४ हजार रुपयांचे खत सील करून विक्री बंदचे आदेश दिले. बेकायदेशीर खत विक्रीप्रकरणी संजयनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कृषी अधिकारी गुणनियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील आणि कृषी उपसंचालक धनाजी पाटील यांना संजयनगर येथील फर्टिलायझर वर्ल्ड खताच्या दुकानात बेकायदेशीर खत विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कृषी विभागाने दुकानाला अचानक भेट देवून सलमान शेख यांच्याकडून खत विक्रीबाबतची माहिती घेतली.

Fertilizer Shortage
Fertilizer Shortage : डीएपी टंचाईवर अशी करा मात

येथे खत विक्रीचा शासकीय परवाना नसल्याचे आढळले. त्यांनी आदिराज न्युट्रीलाईफ सायन्सचे जिनेंद्र कुरुंदवाडे यांच्याकडून खताची खरेदी करून विक्री करीत असल्याचे सांगितले. सांगलीवाडीतील कुरुंदवाडे यांच्या नातेवाइकांच्या घरी खतांचा साठा असल्याचे सांगण्यात आल्याने तेथे जाऊन उपलब्ध खत साठ्याला विक्री बंदचे आदेश दिले.

Fertilizer Shortage
Fertilizers Sale Issue : खत विक्रीच्या नोंदी उशिरा होत असल्याने राज्यात पेच

सांगलीवाडीतील खताचे नमुने तपासणीसाठी घेण्यासाठी गेल्यास तेथील साठा हलविण्यात आल्याचे आढळले. विनापरवाना खत विक्रीप्रकरणी फर्टिलायझर वर्ल्डचे शेख आणि न्युट्रीलाईफचे कुरुंदवाडे यांच्यावर संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक स्वामी करीत आहेत.

जप्त केलेला साठा...

खत विक्रीबाबत कोणतीही नोंद ठेवण्यात आलेली नाही. तेथे उपलब्ध असलेले मिक्स कॉम्बी ५० किलो बॅग, ईडा झिंक ७५ किलो तीन बॅग, ईडा फेरस ५० किलो चार बॅग, ईडा बोरॉन १०० किलो पाच नग, अ‍ॅमिनो अ‍ॅसिड पावडर १२० किलो सहा नग, फुलविक अ‍ॅसिड ७ नग, ग्रीन केल्प ८ नग, ह्युमिक अ‍ॅसिड ९ बॅगा, ऑर्गनिक कार्बन १० बॅग आणि नीम ऑइल ५० लिटर असा १ लाख ३४ हजार रुपयांचा खतांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याला विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com