
Sindhudurg News : गेल्या काही दिवसांपूर्वी निर्माण झालेला खतांचा तुटवडा दूर झाला असून आतापर्यंत १० हजार ९५ टन खत उपलब्ध आहे. यातील ४ हजार १९७ टन खतसाठा शिल्लक आहे. दरम्यान, कृषी विभागाने झाल्याने गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला पॉस मशिनचा वापर न करणाऱ्या विक्री केंद्रावर कारवाईचे संकेत दिले आहेत.
खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात खतांचा तुटवडा निर्माण झाला होता. युरिया आणि डीएपी या खतांचा तुटवडा अधिक होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. परंतु त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून खतांची उपलब्धता होऊ लागली. जिल्ह्यात खरीप हंगामाकरिता १९ हजार ५५७ टन खतांची गरज असते. जूनअखेर १२ हजार २५९ टन खतांचे आवटन मंजूर होते.
त्यापैकी केवळ ५ हजार ९६० मेट्रीक इतके खत उपलब्ध झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात खतांचा तुटवडा निर्माण झाला. भात रोपवाटिका आणि भातरोप पुनर्लागवडीच्या तोंडावर खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे खत तुटवड्याची नोंद केली.
याशिवाय ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवुन खत पुरवठा करण्याची मागणी केली होती. परंतु आता जिल्ह्यात जूनअखेर मंजूर आवंटनाच्या ८२ टक्के खत उपलब्ध झाले आहे.
आतापर्यंत १० हजार ९५ टन खत उपलब्ध झाल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तुटवड्याची समस्या दूर झाली आहे.जिल्हयात सध्या ४ हजार १९७ टन खत साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय काही खत कंपन्यांशी चर्चा सुरू असून येत्या आठवड्यात रत्नागिरी येथे आणखी खत उपलब्ध होणार आहे. दरम्यान, कृषी विभागाने अनुदानित सर्व खते पॉस मशिनद्वारे विक्री करावयाची आहेत.
विक्री केंद्रांनी खतविक्री आणि साठा वेळच्यावेळी अद्ययावत करावा. त्यामध्ये तफावत आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे सकेंत देखील जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईक नवरे यांनी दिले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.