उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या एकरी उत्पादनात घट

२०१८-२०१९ दरम्यान एकरी उत्पादनाचे प्रमाण एकरी २०८० किलो असे होते. या हंगामात त्यात घट होऊन एकरी १८०० किलोची सरासरी गाठण्याचा अंदाज पंजाब कृषी विद्यापीठातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.  
Fearing sharp drop in wheat yield, Punjab farmers seek compensation
Fearing sharp drop in wheat yield, Punjab farmers seek compensationAgrowon
Published on
Updated on

तापमानातील वाढीचा पंजाबमधील गव्हाच्या (Wheat) पिकाला मोठा फटका बसत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे माळव्यात गव्हाच्या एकरी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. द ट्रिब्युनने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाचे (Wheat) एकरी उत्पादन घटून ३०० ते ४०० किलोपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा उष्ण वातावरणात एकरी उत्पादन १८० ते २०० किलोपर्यंत मिळण्याचा अंदाज कृषी संशोधकांनी व्यक्त केला आहे.  २०१८-२०१९ दरम्यान एकरी उत्पादनाचे प्रमाण एकरी २०८० किलो असे होते. या हंगामात त्यात घट होऊन एकरी १८०० किलोची सरासरी गाठण्याचा अंदाज पंजाब कृषी विद्यापीठातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.

Fearing sharp drop in wheat yield, Punjab farmers seek compensation
जुलैपर्यंत ३५ लाख टन गहू निर्यातीचे करार

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तापमानात ६ ते ८ अंश सेल्सियसची वाढ झाली आहे. २०२०-२०२१ या वर्षी ३५.३० लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाची (Wheat Cultivation)लागवड करण्यात आली होती. एकरी उत्पादन १९४० किलो असे होते. यंदा ३५ लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाची लागवड करण्यात आली आहे. मात्र एकरी उत्पादन १८०० किलो असेल, असा अंदाज पंजाब कृषी विद्यापीठाच्या विस्तार विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. जे. एस. भुट्टर यांनी व्यक्त केला आहे.

Fearing sharp drop in wheat yield, Punjab farmers seek compensation
इजिप्तकडून भारतीय गव्हाच्या खरेदीची शक्यता; शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर

उष्णतेच्या लाटेमुळे एकरी उत्पादन २८० किलोवर आले आहे. ज्यामुळे एकरी ५६०० रुपयांचे नुकसान होते आहे. या नुकसानीची दखल घेऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी भटिंडा जिल्ह्यातील शेतकरी हरविंदर पाल यांनी केली आहे.

फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाने (FCI) माळव्यातील गव्हाचे नमुने संकलित केले जाणार आहेत. त्याचे विश्लेषण केले जाणार आहे. त्याविषयीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत विचार केला जाणार असल्याचे फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाचे (FCI) उपव्यवस्थापक प्रत्युष सिन्हा यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com