
Shriwardhan News : अनुकूल हवामानामुळे आंब्याला वेळेत मोहोर आला आहे. साधारण एप्रिल ते मेदरम्यान फळ काढण्यासाठी योग्य होईल, असा विश्वास श्रीवर्धनमधील बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. कृषी विभागाकडूनही यंदा आंब्याचे उत्पादन चांगल्या प्रमाणात होईल, असे सांगितले जात आहे.
रोठा सुपारी व बाणवली नारळानंतर येथे प्रामुख्याने आंब्याचे पीक घेतले जाते. तालुक्यात आंबा पिकाचे उत्पादनक्षम क्षेत्र २,८७० हेक्टर इतके होते. निसर्ग व तौक्ते चक्रीवादळात आंब्याच्या अनेक झाडांची पडझड झाली. सद्यःस्थितीत तालुक्यात आंब्याचे उत्पादनक्षम क्षेत्र १,९१० हेक्टर आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर सुस्थितीतील झाडांची जोपासना करीत व नव्याने आंबा लागवड करीत बागायतदारांनी येणाऱ्या हंगामाची प्रतीक्षा केली.
श्रीवर्धन तालुक्यातील डोंगर उताराच्या तसेच वरकस पडीक जमिनी आंबा पिकास योग्य आहेत. मोहोर येण्याचा काळ हा हवामान तसेच झाडांची निगा यावर अवलंबून आहे. नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते.
मोहोर आल्यापासून सुमारे १०० ते १२० दिवसांत फळे काढण्यास योग्य होतात. सध्याचे पोषक वातावरण बघता, श्रीवर्धन तालुक्यात या वर्षी साधारण चार हजार टन आंबा उत्पादनाची बागायतदारांना अपेक्षा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.