M S Swaminathan : भूकमुक्तीचा ध्यास निमाला... हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामिनाथन यांचे ९८ व्या वर्षी निधन

हरितक्रांतीचे जनक, सुप्रसिध्द शेतीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचं गुरुवारी (ता.२८) वयाच्या ९८ वर्षी निधन झालं. तामिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई येथे त्यांनी ११.२० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
M S Swaminathan
M S SwaminathanAgrowon
Published on
Updated on

Green Revaluation : हरितक्रांतीचे जनक सुप्रसिध्द शेतीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचं गुरुवारी (ता.२८) वयाच्या ९८ वर्षी निधन झालं. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे त्यांनी ११.२० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. स्वामिनाथन यांनी भारतातील कृषी संशोधन संस्थांमध्ये तसेच अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येही काम केलं होतं. त्यांचं शेती क्षेत्रातलं योगदान महत्त्वाचं ठरलं. गहू आणि भाताचे अधिक उत्पादन देणार वाण विकसित करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. डॉ. स्वामिनाथन १९७२ ते १९७९ दरम्यान भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक होते. भूकमुक्तीचा ध्यास घेऊन त्यांनी केलेल्या अतुलनीय कामाचा देशाला अन्नधान्यात उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यात मोठा वाटा राहिला. त्यांच्या शेती क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

स्वामिनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी झाला होता. त्यांचे वडील एम के संबासिवन सर्जन होते. परंतु स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सामील होते. तसेच त्यांच्यावर महात्मा गांधीजींचा प्रभाव होता. त्यांच्याच प्रेरणेतून स्वामिनाथन यांनी प्राथामिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेती क्षेत्रात काम करायचं ठरवलं. त्यातूनच त्यांनी कृषी क्षेत्रातील दोन पदव्या प्राप्त केल्या.

M S Swaminathan
Green Hydrogen : ग्रीन हायड्रोजन तयार करण्याचा विचार व्हावा

हरित क्रांतीतील योगदान

देशातील अन्नधान्य टंचाईवर मात करण्यासाठी सरकार प्रयत्न करत होते. त्यावेळी कृषी शास्त्रज्ञ स्वामिनाथन यांनी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री सी. सुब्रमण्यम आणि जगजीवन राम यांच्या सोबत काम केलं. गहू आणि तांदळाचे उत्पादन वाढवण्यासाठी स्वामिनाथन यांनी तांदूळ आणि गव्हाच्या जास्त उत्पादन देणारी वाण विकसित केले. त्यामुळे पुढे देशात हरित क्रांती घडून आली.

हरित क्रांतीमुळे देशातील गहू आणि तांदूळ उत्पादनात वाढ झाली. शेतकऱ्यांना नवीन वाणांचा स्वीकार केला. आणि भारताचं आयातीवरचं अवलंबित्व संपलं. आज गहू आणि तांदूळ उत्पादनात भारत अग्रेसर देश ठरला आहे.

स्वामिनाथन यांचा सन्मान

अनेक पुरस्कारांनी स्वामिनाथन यांना गौरविण्यात आलं. १९६१ साली बायोलॉजिकल सांयन्समधील योगदानासाठी त्यांना एस.एस.भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसेच कम्युनिटी लीडरशिपसाठी १९७१ साली रॅमन मॅगसेसे तर १९८६ साली अल्बर्ट आइंस्टीन वर्ल्ड सायन्स पुरस्कार तर १९८७ साली वर्ल्ड फूड प्राइज पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं.

२००० साली फ्रेंकलिन डी. रूजवैल्ड फॉर फ्रीडम मेडल आणि महात्मा गांधी प्राइज ऑफ यूनेस्को पुरस्कारही त्यांना देण्यात आला. तसेच भारत सरकारकडून १९६७ साली पद्मश्री, १९७२ पद्मभूषण तर १९८९ पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. डॉ.स्वामिनाथन यांना ८१ मानद डॉक्टरेट मिळाल्या होत्या. तसेच त्यांनी २००७ ते २०१३ दरम्यान राज्यसभा सदस्य म्हणून काम केलं आहे.

दीडपट हमीभावाची शिफारस

देशात २००४ दरम्यान शेतकरी आत्महत्या वाढत होत्या. त्यावेळी शेतकऱ्यांचा अवस्थेचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यावर उपाय सुचवण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी एम.एस.स्वामिनाथन यांच्याकडे होती. २००६ साली स्वामिनाथन यांनी केंद्र सरकारला अहवाल सादर केला. याच अहवालात शेतमालाची किमान आधारभूत किंमत (हमीभाव) उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट असावी, अशी शिफारस करण्यात आली होती. हा आयोग स्वामिनाथन आयोग म्हणून ओळखला गेला. देशभरातील शेतकरी चळवळीने स्वामिनाथन आयोगाची ही शिफारस उचलून धरली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com