Tembhu Irrigation Scheme : वंचित ११० गावांना मिळणार ‘टेंभू’चे पाणी

Agriculture Irrigation : टेंभू उपसा सिंचन योजनेच्या वंचित असणाऱ्या ११० गावांतील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
Irrigation scheme
Irrigation schemeAgrowon

Sangli News : टेंभू उपसा सिंचन योजनेच्या वंचित असणाऱ्या ११० गावांतील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. महामंडळाने पाणी देण्यासाठी सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असून ४८ हजार शेती ओलिताखाली येणार आहे.

टेंभू योजनेच्या तीन जिल्ह्यांतील सात तालुक्यांतील २१० गावांतील शेतीसाठी पाणी दिले जात आहे. परंतु या योजनेपासून अनेक गावे वंचित आहेत. त्यामुळे टेंभू योजनेत ही वंचित गावे समाविष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली होती.

त्यानुसार टेंभू प्रकल्पाने विस्तारित टेंभू योजनेतून वंचित गावांतील शेती ओलिताखाली आणण्यासाठी काम हाती घेतले. त्यासाठी लागणारे पाणी कसे उपलब्ध होईल याचा अभ्यास केला.

विस्तारित टेंभू योजनेतून वंचित गावांना आठ टीएमसी पाण्याची आवश्यकता भासणार असल्याचे प्रकल्पाच्या अभ्यासातून पुढे आले. त्यानुसार पहिल्या लवादानुसार शिल्लक पाणी, कृष्णा प्रकल्प आणि कोयना प्रकल्पातून पाणी देऊ शकतो. यातून आठ टीएमसी पाणी उपलब्ध होईल, असा अंदाज आला.

Irrigation scheme
Tembhu Irrigation Scheme : ‘टेंभू’बाधित जमिनींचा मिळणार मोबदला

दरम्यान, पाण्यच्या उपलब्धतेबरोबरच महामंडळाने यावर्षी वंचित गावांना पाणी देण्यासाठी सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे जुन्या योजनेसह विस्तारित योजनेला लागणारा खर्चही तयार केला आहे.

जुन्या आणि विस्तारित योजनेसाठी तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. त्यासाठी ७२१०.१५ कोटींची आवश्यकता आहे.

विस्तारित टेंभू योजनेत सांगली, सोलापूर जिल्ह्यातील वंचित गावांना पाणी मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव आणि माण हे दोन तालुके दुष्काळीच आहेत. या दोन्ही तालुक्यांतील ४८ गावांचा यामध्ये समाविष्ट केला आहे.

सांगली, सातारा जिल्ह्यासह सांगोला तालुक्यातील वंचित गावांना टेंभूचे पाणी मिळणार असल्याने दुष्काळी तालुक्याचा दुष्काळ मिटवण्याची ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

Irrigation scheme
Tembhu Upsa Irrigation Project : ‘टेंभू’च्या बंदिस्त पाईपलाईनची कामे पूर्णत्वास

प्रत्यक्ष कामांना प्रारंभ कधी

विस्तारित योजनेला मान्यता मिळाली. सर्व्हेक्षण झाले. बंद पाइपलाइनद्वारे पाणी शेताच्या बांधावर मिळणार आहे. परंतु प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. वेळेत काम सुरू झाले तर वंचित गावांना लवकर पाणी मिळेल.

असे मिळणार पाणी

पहिल्या लवादातील

शिल्लक ः ३.५० टीएमसी

कृष्णा प्रकल्प ः २.५० टीएमसी

कोयना प्रकल्प ः २.०० टीएमसी

एकूण ः ८ टीएमसी

सांगली जिल्ह्यातील समाविष्ट गावे

तालुका गावे क्षेत्र मिळणारे पाणी (टीएमसी)

खानापूर ११ ६४७१ १.५

तासगाव १७ ६०२६ १.०

कवठे महांकाळ ९ २४५० ०.५

आटपाडी १२ ५२९४ १.०

जत ५ २६३६ ०.५

एकूण ५४ २७८७७ ४.५

सातारा जिल्ह्यातील समाविष्ट गावे

तालुका गावे क्षेत्र मिळणारे पाणी (टीएमसी)

खटाव २१ ७४४० १.५

माण २७ ५६८६ १.०

एकूण ४८ १३१२६ २.५

सोलापूर जिल्ह्यातील समाविष्ट गावे

तालुका गावे क्षेत्र मिळणारे पाणी (टीएमसी)

सांगोला ८ ५००० १.०

एकूण ८ ५००० १.०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com