Labor Shortage : पावसामुळे शेतकऱ्यांची घालमेल वाढली

Heavy Rain : पावसामुळे अर्धवट सोंगणी राहिलेली सोयाबीन व मका कापणी करायची आहे. यासाठी शेतकरी मजूर शोधत आहेत.
Crop Harvesting
Crop HarvestingAgrowon
Published on
Updated on

Buldana News : मॉन्सूनोत्तर पावसाने दाणादाण उडवली आहे. या स्थितीत सोयाबीन सोंगणी, कापूस वेचणीचे काम शेतशिवारात करावे लागते आहे. कापसाची बोंडे फुटायला सुरुवात झाली आहे. ही कामे करण्यासाठी सध्या सर्वच शेतकरी मजुरांच्या टंचाईने त्रस्त झाले आहेत. वाढीव चुकारे देऊनही मजुरांची उपलब्धता नसल्याने अडचण बनलेली आहे.

पावसामुळे अर्धवट सोंगणी राहिलेली सोयाबीन व मका कापणी करायची आहे. यासाठी शेतकरी मजूर शोधत आहेत. या आठवड्यात तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. त्याने चिंता वाढवली. हातातोंडाशी आलेला शेतीमाल घरी आणण्यासाठी शेतकरी लगबग करीत आहेत. एकाचवेळी मजुरांची मागणी वाढली. त्यामुळे मजुरीच्या दरात सध्या मोठी वाढ झाली आहे.

Crop Harvesting
Buldhana Crop Damage : बुलडाणा जिल्ह्यात पावसाने पुन्हा धूळधाण

नांदुरा तालुक्यात ११ ते १३ ऑक्टोबर या तीन दिवसांत पावसाळ्यात झाला नाही इतका पाऊस झाला असून त्या पावसाचा सर्वाधिक फटका सर्वच महसूल मंडलांना बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील जवळपास २४ हजार शेतकऱ्यांचे ३१ हजार ५१३ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस व मका पिके बाधित झाली आहेत.

शेंबा महसूल मंडलात चक्रीवादळ व गारपीट झाल्यामुळे सर्वच पिके जमीनदोस्त झाली. नदी, नाल्यांना महापूर आल्यामुळे नदी व नाल्याकाठची जमीन पिकासह खरडून गेली आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांचे शेती साहित्य वाहून गेले असून विहिरी खचल्या आहेत.

Crop Harvesting
Paddy Crop Damage : मुळशी तालुक्यात पावसाने भातपिकाचे मोठे नुकसान

एकप्रकारे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसत असतानाच पुन्हा पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकरी लगबगीने शेतीमाल घरी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी मजुरांची मागणी वाढली आहे. पण मजूर मिळत नाहीत.

प्रतवारी बिघडली, माल सुकविण्यातही अडचणी

वेचणी केलेला कापूस व नुकतेच तयार केलेले सोयाबीन, मका या पिकांत आर्द्रता जास्त असल्यामुळे हा सर्व माल घरात गरम होत आहे. वेचलेल्या कापसाला व इतर सर्व पिकांना सुकविण्यासाठी प्रत्येकाला सध्या तारेवरची कसरत करावी लागत आहे. सर्व मालाची प्रतवारी बिघडली असल्याने पुढे सुद्धा भावात शेतकऱ्यांना दणका बसणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com