Agriculture Tourism: शेतीला पर्यटनाची जोड दिल्यास शेतकरी समृद्ध होईल

Actor Milind Shinde: शेतीला जोडव्यवसाय म्हणून कृषी पर्यटन व्यवसाय उभा केला, तर शेतकरी समृद्ध होईल,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांनी केले.
Actor Milind Shinde
Actor Milind ShindeAgrowon
Published on
Updated on

Pune News: ‘‘अवकाळी पाऊस, शासनाची बदलती धोरणे, पर्यावरणीय बदल यामुळे शेतीचे स्वरूप अनिश्चित होत आहे. अनेकदा शेतकऱ्यांच्या हाती निराशाच येते. त्यातून सर्वत्र हताशाचे वातावरण पाहायला मिळते. मात्र, शेतीला जोडव्यवसाय म्हणून कृषी पर्यटन व्यवसाय उभा केला, तर शेतकरी समृद्ध होईल,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांनी केले.

परभन्ना फाउंडेशन, कृषी पर्यटन विश्व आणि धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठान आयोजित जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त ‘महाराष्ट्र कृषी पर्यटन परिसंवाद २०२५’ कार्यक्रमात मिलिंद शिंदे बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी ‘शासकीय धोरणे आणि कृषी पर्यटनाचा विकास’ या विषयावर मान्यवरांनी विचार मांडले.

Actor Milind Shinde
Agriculture Innovation: पुणे, नागपूर, सोलापुरात शुद्ध लागवड सामग्री केंद्रे होणार

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील, जिल्हा पर्यटन अधिकारी अजिंक्य लुगडे, मुलूख फार्म्स कृषी पर्यटन केंद्राचे कृषिराज पिलाणे यांनी विचार मांडले.

प्रसंगी परभन्ना फाउंडेशनचे संस्थापक गणेश चप्पलवार, मनीषा उगले, धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठानचे पंकज चव्हाण, वल्लरी प्रकाशनाचे व्यंकटेश कल्याणकर, सारंग मोकाटे, असीम त्रिभुवन, सूर्यकांत पोतुलवार, अजित मांदळे, महेश गोरे, महेश चप्पलवार आणि सुप्रिया थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

Actor Milind Shinde
Agriculture Development: कार्यालयात बसून शेतकरी, शेती विकास योजना होणार नाहीत: शिवराजसिंह चौहान

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील म्हणाल्या, की उपलब्ध साधनसामग्रीच्या वापर करून शेतीला पूरक व्यवसाय कसा करता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे. आपणच आपला आवाज बनून या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास साधून तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.

शासनाच्या योजनांचा फायदा घेऊन कृषी पर्यटन उद्योजक वाढवण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत. कृषी पर्यटनाची ओळख महाराष्ट्राने भारताला करून दिली. कृषी पर्यटन ही केवळ संकल्पना नसून देशाला दिशा देण्याचे काम सुरू असल्याचे गणेश चप्पलवार यांनी नमूद केले.

अजिंक्य लुगडे, कृषिराज पिलाणे यांनीही विचार मांडले. व्यंकटेश कल्याणकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. पंकज चव्हाण यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com