Agriculture Development: कार्यालयात बसून शेतकरी, शेती विकास योजना होणार नाहीत: शिवराजसिंह चौहान

Shivraj Singh Chauhan: कृषिमंत्री, कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ यापुढे कार्यालयात बसून शेतकरी व शेती विकासाच्या योजना तयार करणार नाहीत. शेती शिवारात शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जातील, शेतकऱ्यांशी संवाद साधतील, शेतकरी सांगतील त्या पद्धतीनेच योजना तयार केल्या जातील.
Farm Reforms
Farm ReformsAgrowon
Published on
Updated on

Narayangaon News: ‘‘देशाच्या शेतीला व शेतकऱ्यांना योग्य दिशा देण्यासाठी कृषिमंत्री, कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ यापुढे कार्यालयात बसून शेतकरी व शेती विकासाच्या योजना तयार करणार नाहीत. शेती शिवारात शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जातील, शेतकऱ्यांशी संवाद साधतील, शेतकरी सांगतील त्या पद्धतीनेच योजना तयार केल्या जातील. पीक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी संशोधन केले जाईल.

बोगस कीटकनाशकांची विक्री करून शेतकऱ्यांची व शेतीची फसवणूक करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही. कडक कारवाई करण्यासाठी कायदा तयार केला जाईल. विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधून राज्य व विभागनिहाय पिकांच्या समस्या समजून घेतल्या जातील व त्यावर उपाययोजना केल्या जातील. ‘कृषी’चा रोड मॅप तयार केला जाईल, ’’ अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली 

Farm Reforms
Agriculture Seeds and Input Scarcity : बियाणे, खते, कीटकनाशकांची कृत्रिम टंचाई केल्यास कारवाई

विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत केंद्रीय कृषिमंत्री चौहान मंगळवारी (ता. ३) जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी १४ नंबर येथील महादेव वाघ यांच्या शीतगृहाला भेट दिली. या वेळी त्यांनी तालुक्यातील फळ भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्यांची माहिती घेतली. त्यानंतर अकरा वाजता जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो उपबाजाराला भेट देऊन टोमॅटो उत्पादकांशी संवाद साधला.

त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र आयोजित पीक प्रात्यक्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधून शेती समस्यांची माहिती घेऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर होते. यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, पराग उद्योग समूहाचे देवेंद्र शहा, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे,विश्वस्त प्रकाश पाटे,उपाध्यक्ष शशिकांत वाजगे,कार्यवाह रवींद्र

Farm Reforms
KVK Employees Union: अखिल भारतीय कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघाची स्थापना

पारगावकर, संचालक डॉ.आनंद कुलकर्णी,ऋषिकेश मेहेर,डॉ.संदीप डोळे, एकनाथ शेटे, कृषी आयुक्त सूरज मांढरे,डॉ.एस. के. सिंग, केव्हीकेचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, आशा बुचके, बाजार समितीचे संचालक धनेश संचेती, माऊली खंडागळे, प्रियांका शेळके, अर्चना वारुळे, प्रदीप कंद,अशोक घोलप, संतोष खैरे, आशिष माळवदकर, संदीप गोते पाटील आदी उपस्थित होते.

केंद्रीय कृषिमंत्री चौहान म्हणाले, की हवामान, पीक परिस्थितीनुसार कोणती औषधे फवारावीत, त्याचे प्रमाण काय असावे, माती परीक्षणाद्वारे मातीचे आरोग्य, त्यानुसार कोणत्या खतांची गरज आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन विकसित जातींची माहिती, पिकांची टिकाऊ क्षमता कशी वाढेल ही माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या विकसित कृषी संकल्प अभियानाचा उद्देश शेतकरी समस्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन समजून घेणे व त्यावर उपाययोजना करून देशातील शेतीला योग्य दिशा देणे हा आहे. देशातील कृषी अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ, मंत्री शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहेत. या पुढे कार्यालयात बसून निर्णय घेतला जाणार नाही. शेतकरी सेवेसाठी मी कृषी मंत्री आहे. सूत्रसंचालन राहुल घाडगे यांनी केले.

Farm Reforms
Micro food processing industry : सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत सांगली जिल्हा राज्यात अव्वल ; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार; ५३८ उद्योगांना मंजुरी

आभार रवींद्र पारगावकर यांनी मानले. श्री. चौहान म्हणाले, की आयसीआरकडे सोळा हजार शास्त्रज्ञ आहेत. कृषी शास्त्रज्ञ आपल्या संस्थेत प्रयोगशाळेतून काम करतात. त्यांचा शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद नसतो. त्यामुळे शेती हिताचे निर्णय होत नाहीत. शेतकऱ्याला शेतीचे व्यावहारिक ज्ञान आहे. रोजच्या समस्या त्याला माहीत आहेत. कृषी शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्यात जोपर्यंत प्रत्यक्ष संवाद होत नाही. तोपर्यंत शेतीची प्रगती होणार नाही.

 ‘वाहतूक खर्च केंद्रशासन करणार’ 

चौहान म्हणाले, की स्थानिक बाजारपेठेत शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणी सापडलेला आहे. त्यासाठी केंद्र शासनाने एक योजना तयार केली असून यापुढे शेतकरी कोणत्याही बाजारपेठेत शेतमाल विक्रीसाठी घेऊन गेल्यास त्याचा वाहतूक खर्च केंद्र सरकार करेल.

‘नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे काम उत्कृष्ट’ 

येथील कृषी विज्ञान केंद्राला मी दुसऱ्यांदा भेट दिली आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर शेतीच्या व शेतकऱ्यांच्या प्रगतीत कृषी विज्ञान केंद्राची भूमिका महत्त्वाची असून येथील कृषी विज्ञान केंद्राचे काम उत्कृष्ट आहे.

या अभियानांतर्गत ३० कृषी शास्त्रज्ञ शेताच्या बांधावर जाऊन दोन लाख शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.दहा हजार मेट्रिक टन क्षमतेचे शीतगृह उभारणीसाठी व ऑडिटोरियम उभारणीसाठी केंद्र शासनाने मदत करावी. त्यासाठीचा प्रस्ताव भारतीय कृषी अनुसंधानकडे पाठवला जाईल.
- अनिल मेहेर, अध्यक्ष, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com