Shaktipeeth Highway Issue : ‘शक्तिपीठ’प्रश्‍नी महायुतीला शेतकरी देणार दणका

Rajyavyapi Nirdhar Parishad : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, महामार्ग रद्द न करणाऱ्या महायुती सरकारच्या उमेदवारांना पराभूत करा, बारा जिल्ह्यांमध्ये महायुती उमेदवारांच्या विरोधात प्रचार करा, अशा ठरावांसहित सोमवारी (ता. २१) राज्यव्यापी निर्धार परिषद झाली.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwayAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, महामार्ग रद्द न करणाऱ्या महायुती सरकारच्या उमेदवारांना पराभूत करा, बारा जिल्ह्यांमध्ये महायुती उमेदवारांच्या विरोधात प्रचार करा, अशा ठरावांसहित सोमवारी (ता. २१) राज्यव्यापी निर्धार परिषद झाली. दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग विरोधात १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची राज्यव्यापी शेतकरी निर्धार परिषद झाली.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गप्रश्नी कोल्हापुरात शेतकरी आक्रमक; पालकमंत्री मुश्रीफांचा ताफा आडवला

या प्रसंगी खासदार शाहू महाराज म्हणाले, की गेले आठ महिने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणे ही महायुती सरकारची चूक असून निषेधार्ह बाब आहे. शेतकऱ्यांनी महायुती उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेतली तर ती योग्यच आहे. आचारसंहितेपूर्वी सरकारने महामार्ग रद्दचा निर्णय घेणे गरजेचे होते. त्यामुळे आता सरकारला त्याची किंमत चुकवावी लागेल.

Shaktipeeth Highway
Shaktipith Highway : शक्तिपीठ महामार्ग सरकार रेटणार

या वेळी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सहसचिव डॉ. अमृता पाठक, संजयबाबा घाटगे, विजय देवणे, समरजीत घाटगे, समन्वयक गिरीश फोंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालिंदर पाटील, किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, नांदेडचे शेतकरी सतीश कुलकर्णी, परभणीचे विजय बेले, सांगलीचे उमेश एडके, सिंधुदुर्गचे नंदन वेंगुर्लेकर, लातूरचे अनिल ब्याळे, सोलापूरचे गणेश बोडके, हिंगोलीचे ज्ञानेश्वर कराळे यांची भाषणे झाली.

विक्रांत पाटील, एम. पी. पाटील, महादेव धनवडे, कृष्णात पाटील, शिवाजी कांबळे, गोकुळ संचालक प्रकाश पाटील, आनंदा पाटील, शिवाजी पाटील, युवराज शेटे, तानाजी भोसले, जम्बु चौगुले उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com