Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना योग्यवेळी कर्जमाफी दिली जाईल: अजित पवार

Ajit Pawar: अकोल्यात जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं की, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारलेली नाही. याशिवाय कृषी व पूरक व्यवसायांसह जिल्हा विकास कार्यक्रमांवरही त्यांनी सखोल आढावा घेतला.
DCM Ajit Pawar
DCM Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Akola News:‘‘राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही, असे सरकारने कधीही म्हटलेले नाही. योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल,’’ असे स्पष्ट संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी अकोला, वाशीम जिल्ह्यांच्या विकासाचा संयुक्त आढावा घेतला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, आमदार संजय खोडके, आमदार अमोल मिटकरी, आमदार किरण सरनाईक यांची उपस्थिती होती.

DCM Ajit Pawar
Ajit Pawar : ‘सीडसा’ प्रयोगशाळांसाठी उरणीसाठी ९० कोटी देणार

ते म्हणाले, की आजच्या बैठकीत अकोला, वाशीम जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाचा आढावा घेतला. गेल्या वेळी ९० टक्केच म्हणजे २७० कोटींचा खर्च झाला, असे होणे योग्य नाही. वेळेत खर्च व्हायला हवा होता. त्यात चुका दिसत आहेत. समन्वय नसल्याचे दिसते.

पण यावर्षीचा निधी कुठल्याही परिस्थितीत वेळेत खर्च व्हावा अशा स्पष्ट सूचना यंत्रणांना दिल्या आहेत. बैठकीत केंद्र व राज्याच्या योजनांचाही आढावा घेतला. राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर १०० दिवसांचा कृती कार्यक्रम यंत्रणांना देण्यात आला होता. त्याचाही आढावा घेतला. आता १५० दिवसांचा कार्यक्रम देण्यात आला आहे.

DCM Ajit Pawar
Loan Waiver for Farmers : योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू; उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

कृषी विषयाचा आढावा

बैठकीत खरीप हंगामाच्या अनुषंगाने बी-बियाणे, खतांची उपलब्धता, पीककर्ज वाटपाचा आढावा घेतल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. बी-बियाणे पुरेशा प्रमाणात आहे. डीएपीची कमतरता आहे. त्याबाबत कॅबिनेटमध्ये गेल्यावेळी निर्णय झालेला असून काय करता येईल, याबाबत कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत.

बी-बियाणे, खताची कुणी लिंकिंग करीत असेल तर संबंधितांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती द्यावी. त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. दुग्ध विकासाबाबत केंद्र राज्याच्या चांगल्या योजना आहेत. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊन पूरक व्यवसायातून उत्पन्न वाढीसाठी पुढाकार घ्यायला हवा, असेही त्यांनी सुचवले.

इतर ठळक मुद्दे

- अकोला विमानतळाच्या प्रश्‍नावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा करून तो सोडवण्याचे आश्‍वासन.

- लाडक्या बहिणींसाठी सुरू असलेली योजना बंद करण्याचा कोणताही विचार नाही. पात्र लाभार्थींना नियमित निधी दिला जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com