Sugarcane Price Demand : उसाला पहिली उचल प्रतिटन ३३०० रुपये द्या

Shetkari Kruti Samiti March: पहिली उचल प्रतिटन ३३०० रुपये मिळावी आणि गेटकेन उसाचे गाळप पूर्ण बंद करावे, या मागण्यांसाठी शेतकरी कृती समितीने शनिवारी (ता. २८) सोमेश्वर कारखान्यावर मोर्चा काढला.
Farmer Protest
Farmer ProtestAgrowon
Published on
Updated on

Pune News : पहिली उचल प्रतिटन ३३०० रुपये मिळावी आणि गेटकेन उसाचे गाळप पूर्ण बंद करावे, या मागण्यांसाठी शेतकरी कृती समितीने शनिवारी (ता. २८) सोमेश्वर कारखान्यावर मोर्चा काढला. याप्रसंगी झालेल्या चर्चेनंतर विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी ५ जानेवारीपर्यंतची मुदत संचालक मंडळास देण्यात आली. अन्यथा ९ जानेवारीला ‘काटा बंद’ आंदोलन करणार असल्याचा निर्णायक इशारा कृती समितीने दिला आहे.

Farmer Protest
Sugarcane Price Demand : उसाला प्रतिटन ३३०० रुपये बाजारभाव द्या ; रयत शेतकरी संघटनेची मागणी

शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक सभासदांनी शनिवारी मोर्चा काढून कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांना निवेदन दिले. याप्रसंगी शहाजी जगताप, धन्यकुमार जगताप, अंकुश जगताप, एकनाथ होळकर, संपतराव भेलके, संजय घाडगे, लक्ष्मण गावडे, राहुल जगताप, राजकुमार बनसोडे, प्रकाश जगताप, संपतराव लकडे, शिवाजी गडदरे, हेमंत काकडे, अॅड. अनंत सकुंडे, अविनाश जगताप, संभाजी काकडे, दत्तात्रेय भोईटे, बंटीराजे जगताप, अमरसिंग चव्हाण उपस्थित होते.

Farmer Protest
Sugarcane FRP : उसाला पाच हजार रुपये दर द्या, अन्यथा हवाई अंतराची अट रद्द करा

या मोर्चास उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, जेष्ठ संचालक लक्ष्मण गोफणे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव सामोरे गेले. याप्रसंगी सतीश काकडे यांनी, चव्वेचाळीस दिवसात उचल का दिली नाही? सभासदांची उसतोड लांबत असतानाही गेटकेन बंद का केला नाही? निवेदनांवर उत्तरे का दिली जात नाहीत? असे जाब विचारत संचालक व कार्यकारी संचालकांना धारेवर धरले

कृती समितीच्या मागण्या

३३०० रुपये पहिली उचल

गेटकेनेचे गाळप पूर्ण बंद करावे

सभासदांच्या ऊसतोडीला प्राधान्य द्यावे

कर्जमाफीच्या लाभाकरीता सोसायटीच्या कर्जांपोटी कपात करू नये

मजुरांनी ऊस जळीत केल्यास कपात करू नये

मुद्दाम ऊस जाळणाऱ्या शेतकऱ्यांना दंड करावा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com