Sugarcane Price Demand : उसाला प्रतिटन ३३०० रुपये बाजारभाव द्या ; रयत शेतकरी संघटनेची मागणी

Sugarcane Market : शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन ३३०० रुपये बाजारभाव मिळावा, या मागणीसाठी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने अष्टापूर फाटा (ता. हवेली) येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Sugarcane
SugarcaneAgrowon
Published on
Updated on

Pune News : शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन ३३०० रुपये बाजारभाव मिळावा, या मागणीसाठी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने अष्टापूर फाटा (ता. हवेली) येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्या रयत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरल्या. त्यानंतर श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर रयत शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांना घेराव घालण्यात आला.

याबाबत रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख म्हणाले, ‘‘कारखान्यांनी बऱ्यापैकी उपप्रकल्प निर्मिती केलेली आहे. त्यामुळे कारखान्याला दहा ते बारा हजार रुपये एक टनाला मिळतात. मात्र कारखाना टनाला फक्त २६०० रुपये बाजारभाव देत आहे. त्यातही अनेक कारखाने वजनाला काटे मारून शेतकऱ्याची फसवणूक करतात.

Sugarcane
Sugarcane Crop Management : कमी व्यवस्थापन खर्चात ऊसातील खोडवा नियोजनावर भर

दौंड तालुक्यातील कारखानदार एकमेकांना पुढे करत संगनमताने एकजूट करत दरवर्षी उसाचे बाजारभाव जाहीर करतात. कोल्हापूर, तसेच बारामती तालुक्यातीलही काही साखर कारखाने नेहमीच दौंड तालुक्यातील साखर कारखान्यापेक्षा उच्चांकी बाजारभाव देतात. सर्वच खतांच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अक्षरक्षा मेटाकुटीला आलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बाजारभावाबाबत एकत्र येणे काळाची गरज आहे.

Sugarcane
Sugarcane Productivity : अनुभव, व्यवस्थापनातून टिकवली उसाची उत्पादकता

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल, हेमंत चौधरी, बबनराव गायकवाड, अंकुश हंबीर, पुरुषोत्तम हंबीर, सरपंच एस. एस. तळेकर, सुशील शिंदे, किरण वडघुले, महादेव हंबीर, माधुरी वडघुले, सोनाली खेत्रे, अनिकेत खेत्रे, श्रीहरी कोतवाल, मीरा मांढरे आदी उपस्थित होते.

कारखान्याने २६०० रुपये बाजारभाव दिल्याने आमचे भांडवलपण वसूल होत नाही. रात्रंदिवस बिबट्याला, सापाला न घाबरता मी स्वतः शेती करते. अनेक अडचणींचा सामना करून शेती करावी लागते. मी अठरा महिने उसाला पाणी भरले आहे. महागाईमुळे उसाला झालेला खर्चही वसूल होत नाही.
माधुरी वडघुले, महिला सरचिटणीस, रयत शेतकरी संघटना
शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही उसाला बाजारभाव देत आहोत. सध्या साखरेचे बाजारभावदेखील उतरले आहेत. साखर आयुक्तांच्या नियमाप्रमाणे आम्ही पहिला हप्ता २६०० रुपये दिला आहे. पुढील हप्ते एफआरपीनुसार, तसेच साखरेचा उतारा आम्ही देणार आहोत. शेतकऱ्याला एक पैसाही कमी देणार नाही.
पांडुरंग राऊत, अध्यक्ष, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com