Solar Energy : निम्न वर्धा प्रकल्पातून होणार ५०५ मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती

Solar Project : वरुड-धानोडी येथील वर्धा नदीवर असून यावर प्रस्तावित असलेल्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्पाकरिता महानिर्मितीने पूर्ण व्यवहार्यता सर्वेक्षण केले.
Solar Project
Solar ProjectAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : निम्न वर्धा प्रकल्पावर उभारण्यात येणाऱ्या ५०५ मेगावॉट क्षमतेच्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्प विकासासाठी राज्य शासनाच्या ‘महानिर्मिती आणि केंद्र शासनाच्या ‘सतलज जल विद्युत निगम लिमिटेड’च्या(एसजेव्हीएनलि.) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातील सामंजस्य करारावर मुंबईत स्वाक्षऱ्या केल्या.

या वेळी ‘महानिर्मिती’ आणि ‘एसजेव्हीएनलि.’ तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वर्धा जिल्ह्यातील स्थानिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे जवळपास १४०० व्यक्तींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.

Solar Project
Solar Project : तीन मेगावॉटचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

निम्न (लोअर) वर्धा प्रकल्प हा वर्धा जिल्ह्यातील आर्वी जवळील वरुड-धानोडी येथील वर्धा नदीवर असून यावर प्रस्तावित असलेल्या तरंगता सौरऊर्जा प्रकल्पाकरिता महानिर्मितीने पूर्ण व्यवहार्यता सर्वेक्षण केले. या प्रकल्पासाठी जवळपास ७३२ हेक्टर जलक्षेत्राची निवड केली जाणार आहे.

तर विकासकामांसाठी जवळपास ३०३० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून जवळपास १०५१.२८ दशलक्ष युनिट्स वार्षिक हरित ऊर्जा निर्मिती होणार आहे. ३६ महिन्यांमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पामुळे राज्यात सौरऊर्जा निर्मितीला चालना मिळेल आणि नूतनीकरण योग्य बंध (आरपीओ) पूर्ण करण्यास मदत मिळेल.

Solar Project
Solar Project : वनामकृवित ५०० किलोवॉट सौर वीज प्रकल्पाची उभारणी

४९/५१ अशा समभागाने करार

या प्रकल्पाच्या माध्यमातून पारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी महाग जीवाश्म इंधन खरेदी टाळता येईल तसेच वार्षिक जवळपास ८,६२,०४९ कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन टन कमी होईल.

वार्षिक जवळपास ८,४९,४३४ कोळशाचाही वापर टनाने कमी करण्याकरिता मदत मिळणार आहे. ४९/५१ अशा समभागाने या प्रकल्पाकरिता ‘सतलज जल विद्युत निगम लिमिटेड’ आणि ‘महानिर्मिती’ यांच्यामध्ये करार करण्यात आलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com