Crop Loss Compensation : राज्यातील नुकसानग्रस्तांना मिळणार २९२० कोटी ५७ लाखांची मदत

Assistance for Affected Farmers : मराठवाड्यात जून ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी २९२० कोटी ५७ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने अखेर मंजुरी दिली आहे.
Crop Loss
Crop LossAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यात जून ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी २९२० कोटी ५७ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने अखेर मंजुरी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जून ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी, पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीसाठी राज्यातील विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले होते. परंतु निवडणुका आणि आचारसंहिता यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्तांना निश्‍चित मर्यादेनुसार मदत देण्याचा प्रश्‍न शासन स्तरावर प्रलंबित होता.

Crop Loss
Crop Damage Compensation : नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना नव्या सरकारची प्रतीक्षा

अखेर मंगळवारी (ता.१०) शासनाने राज्यातील २६ लाख ४८ हजार २४७ शेतकऱ्यांचे २० लाख २४ हजार ६२०.९७ हेक्टरवर झालेल्या नुकसानीसाठी २९२० कोटी ५७ लाख ५० हजार रुपये मदत देण्यास मंजुरी दिली आहे. कोणत्या तरतुदीमधून निधीचे वितरण करायचे याविषयी शासन निर्णय स्पष्टता देण्यात आली आहे. विशेष करून सप्टेंबर, जून, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आदी महिन्यांतील विविध जिल्ह्यांत झालेल्या नुकसानीपोटी नुकसानग्रस्तांना मदतीचे वाटप केले जाणार आहे.

या शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या मदतीत सर्वाधिक नुकसान भरपाईचा वाटा मराठवाड्याच्या वाटेवर आला असून त्या पाठोपाठ नागपूर, पुणे व शेवटी नाशिक विभागाचा क्रमांक लागतो. नाशिक विभागातील नाशिक धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे विभागातील सातारा, सोलापूर, सांगली, नागपूर विभागांतील वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा; तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर आदी जिल्ह्यांतील जून ते ऑक्टोबर दरम्यान विविध टप्प्यांवर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग शासन निर्णयामुळे मोकळा झाला आहे.

Crop Loss
Crop Damage Compensation : धाराशिवमधील अतिवृष्टीच्या भरपाईचे ३०८ कोटी रखडले

विभागनिहाय नुकसानग्रस्त शेतकरी, क्षेत्र व मदत

विभाग : छत्रपती संभाजीनगर

बाधित क्षेत्र १९ लाख ३६ हजार १०९ हेक्टर

शेतकरी २५ लाख १७ हजार ३८४

मदत २७३८ कोटी ६२ लाख ३ हजार

विभाग : नागपूर

बाधित क्षेत्र ३८,४६८.१५ हेक्टर

शेतकरी ७५ हजार ७७

मदत १११ कोटी ४१ लाख ६ हजार

विभाग : नाशिक

बाधित क्षेत्र ७०६२.४२ हेक्टर

शेतकरी १२,४६८

मदत ८ कोटी ९४ लाख

विभाग : पुणे

बाधित क्षेत्र ४२९८१.२२ हेक्टर

शेतकरी ४३ हजार ३००

मदत ६१ कोटी ६० लाख ४० हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com