Hail Crop Damage : जत तालुक्यात गारपिटीने दोन कोटी रुपयांचे नुकसान

Unseasonal Rain crop Loss : जत तालुक्यात मंगळवारी (ता. २५) आठ गावांत गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून बेदाण्यालाही फटका बसला आहे.
Hail Crop Damage
Hail Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Sangli News : जत तालुक्यात मंगळवारी (ता. २५) आठ गावांत गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून बेदाण्यालाही फटका बसला आहे. दोन कोटीहून अधिक नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच जिल्ह्यातील विविध भागांत वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

जत तालुक्यातील तिकोंडी, भिवर्गी, पांडोझरी, कोणबगी, संख, धुळकरवाडी, कोंत्येव बोबलाद आदी भागात गारपीट व वादळी वारे झाले. या भागातील द्राक्ष उत्पादकांना फटका बसला आहे. काहीच्या बागा मुळासकट उन्मळून पडल्या. वाऱ्याने बागेतील घडांची मोठी गळती झाली. गारांमुळे चांगल्या फळांना दणका बसला.

Hail Crop Damage
Buldana Hail Fall News : शेगाव तालुक्यात केस गळतीची समस्या: नागरिकांमध्ये चिंता वाढली

तिकोंडी येथील सिद्धाण्णा गोब्बी पाच एकर, भैराप्पा अमृततटटी चार एकर, संतोष गोब्बी दोन एकर, शिवानंद गोब्बी दोन एकर, आप्पासो व्हनकंडे, उमेश व्हनकंडे यांची पाच एकर, सोमू गोब्बी दोन एकर, भरमू गोब्बी एक एकर पांडोझरी येथील पुजारी यांची दोन एकर यासह रॅकवरील बेदाण्यालाही फटका बसला.उमराणी, जत शहर, मुचंडी, सिद्धनाथ, येळवी, सनमडी, बनाळी, शेगाव, बिरनाळ, बिळूर, खोजनवाडी, मेंढीगिरी, उमदीचा काही भाग, माडग्याळ, अंकलगी दरिबडची, दरिकोणूर या भागांतही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

Hail Crop Damage
Hail Fall News : केस गळती बाधित गावांत ‘आयसीएमआर’ची तपासणी

अनेक ठिकाणी नासधूस

तडवळे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक घरांचे पत्रे व छप्पर उडाले असून पिकांचेही नुकसान झाले आहे. प्रवेशद्वारावरील मुख्य रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. सांगली, मिरज शहरांसह महापालिका क्षेत्र परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटल्या, तर काही ठिकाणी झाडे पडली आहेत.

महिलेचा वीज पडून मृत्यू

शिराळा तालुक्यातील तडवळे येथे शेतात गेलेल्या सुनंदा पांडुरंग पाटील (वय ४५) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. पुतण्या सूरज पाटील यांनी शिराळा पोलिसांत माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com